राज्य खो-खो स्पर्धाः पुरुषांमध्ये मुंबई उपनगर तर महिलांमध्ये पुणे अजिंक्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 06:15 PM2019-12-16T18:15:24+5:302019-12-16T18:15:49+5:30

ऋषिकेश मूर्चावडेला राजे संभाजी तर काजल भोरला राणी आहील्या पुरस्कार

State Kho-Kho Competition: Mumbai suburbs men's and Pune women team won title | राज्य खो-खो स्पर्धाः पुरुषांमध्ये मुंबई उपनगर तर महिलांमध्ये पुणे अजिंक्य!

राज्य खो-खो स्पर्धाः पुरुषांमध्ये मुंबई उपनगर तर महिलांमध्ये पुणे अजिंक्य!

Next

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सोलापूर अॅम्युचर खो खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या 56 वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबई उपनगर, तर महिलांमध्ये पुणे जिल्हा अजिंक्य ठरले आहेत. स्पर्धेत अष्टपैलू ठरलेलल्या खेळाडूला राजे संभाजी व राणी आहील्या पुरस्कारचे चषक देऊन गौरवण्याचे ठरले आहे. ऋषिकेश मूर्चावडेला राजे संभाजी तर काजल भोरला राणी आहील्या पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याला अतिशय अटीतटीच्या सामन्यात लघुत्तम आक्रमणात 59 सेकंदांनी पराभूत केले. पुरुषांचा हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय रंगतदार अवस्थेत झाला. निर्धारित वेळेत ज्यावेळी सामना संपला त्यावेळी दोन्ही संघ 17-17 (9-8, 8-9) अशा समसमान गुणसंख्ये वर होते. त्यामुळे ज्यादा डाव खेळण्यात आला त्यावेळी दोन्ही संघांनी 07-07  सात अशी गुणसंख्या नोंदवली. त्यानंतर मात्र मुंबई उपनगर ने जोरदार रणनीती आखत हा सामना लघुत्तम आक्रमणात 59 सेकंदांनी जिंकला. या स्पर्धेत अष्टपैलू ठरलेल्या मुंबई उपनगरच्या ऋषिकेश मुर्च्यावडेने दोन्ही डावात प्रत्येकी एक मिनिट वीस सेकंद संरक्षण केले व आक्रमणात दोन खेळाडू बाद केले, अक्षय भांगरेने एक मिनिट वीस सेकंद, एक मिनिट चाळीस सेकंद व एक मिनिट तीस सेकंद संरक्षण करून आक्रमणात तीन खेळाडू बाद केले. 

खरंतर अक्षयनेच लघुत्तम आक्रमणात एक मिनिट सहा सेकंद देत हा सामना मुंबई उपनगरला जिंकून दिला. अनिकेत पोटे ने एक मिनिट दहा सेकंद व एक मिनिट तीस सेकंद संरक्षण करून पाच खेळाडू बाद केले. प्रतीक देवरेने एक मिनिट वीस सेकंद एक मिनिट व एक मिनिट दहा सेकंद संरक्षण करून आक्रमणात दोन खेळाडू बाद केले तर निहार दुबळे ने चार खेळाडू बाद केले. पराभूत पुण्याच्या सागर लेंगरेने एक मिनिट वीस सेकंद, एक मिनिट व एक मिनिट संरक्षण करत पाच खेळाडू बाद केले सुयश गरगटेने एक मिनिट वीस सेकंद, एक मिनिट चाळीस सेकंद व दोन मिनिटे संरक्षण करताना दोन खेळाडू बाद केले मात्र लघुत्तम आक्रमणात या खेळाडूला सात सेकंदाचीची वेळ देता आल्यामुळे पुण्याला पराभव पत्करावा लागला, प्रतीक वाईकरने एक मिनिट चाळीस सेकंद, दोन मिनिटं व एक मिनिट संरक्षण करताना तीन खेळाडू बाद केले अक्षय गणपुलेने एक मिनिट चाळीस  सेकंद, एक मिनिट व दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करून एक खेळाडू बाद केला मात्र लघुत्तम आक्रमणाच्या कसोटीच्या काळात मुंबई उपनगरने आखलेली रणनीती मुंबई उपनगरला हॅट्रिक सह तिसरे अजिंक्यपद मिळवून देण्यात उपयोगी पडली.

महिलांमध्ये सलग पाच अजिंक्यपदा नंतर ठाण्याला पुण्याने पराभवाचा धक्का देत अजिंक्यपदावर नाव कोरले. महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने ठाण्याचा 11-09 असा दोन मिनिटे चाळीस सेकंद राखून दोन गुणांनी सहज विजय मिळवला. या सामन्यात पुण्याच्या कोमल दारवटकरने दोन मिनिटे तीस  सेकंद व एक मिनिट चाळीस सेकंद संरक्षण केले, स्नेहल जाधवने दोन मिनिटे व एक मिनिट तीस सेकंद संरक्षण करून एक खेळाडू बाद केला, काजल भोरने एक मिनिट वीस सेकंद संरक्षण करून पाच खेळाडू बाद केले तर भाग्यश्री जाधवने एक मिनिट पन्नास सेकंद व एक मिनिट तीस सेकंद संरक्षण केले. पराभूत ठाण्याच्या रेश्मा राठोडने दोन मिनिटे वीस सेकंद व एक मिनिट तीस सेकंद संरक्षण करून दोन खेळाडू बाद केले मीनल भोईरने दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करून एक खेळाडू बाद केला तर रूपाली बडे ने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण करून एक खेळाडू बाद केला.

पुरस्कार                                               पुरुष                                             महिला
सर्वोत्कृष्ट संरक्षक          -           अक्षय गणपुले (पुणे)                               रेश्मा राठोड (ठाणे)
सर्वोत्कृष्ट आक्रमक        -           सुयश गरगटे (पुणे)                                प्रियंका इंगळे (पुणे)
अष्टपैलू खेळाडू             -           ऋषिकेश मुर्च्यावडे (मुंबई उपनगर)        काजल भोर (पुणे)
 

Web Title: State Kho-Kho Competition: Mumbai suburbs men's and Pune women team won title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.