राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : पुलगाव संघाने एका गुणाचे फरकाने अमरावती संघाला नमवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 07:35 PM2018-12-01T19:35:55+5:302018-12-01T19:36:19+5:30

विदर्भ राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी पहिला सामना अमरावती - पुलगाव संघात रंगला.

State level Kabaddi competition: Pulgaon team defeats Amravati team with one points | राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : पुलगाव संघाने एका गुणाचे फरकाने अमरावती संघाला नमवले

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : पुलगाव संघाने एका गुणाचे फरकाने अमरावती संघाला नमवले

Next

अमरावती :  विदर्भ राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी पहिला सामना अमरावती - पुलगाव संघात रंगला. चुरशीच्या लढतीत पुलगावने एका गुणाने बाजी मारली. रुख्मिणी नगरातील नेताजी सामाजिक विकास संस्था व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

शनिवारी सकाळापासूनच रंगलेल्या सामन्यात नागपूर व अकोला संघाने वर्चस्व गाजविले. इतरही जिल्ह्यांतील संघांनी उत्तम कामगिरी बजावली. पुरूष विभागातून गाडगेबाबा संघ अमरावती (६३ गुण) व नेताजी क्रीडा मंडळ अमरावती (४७) मध्ये रंगलेल्या सामन्यांत गाडगेबाबा संघाचे पारडे भारी राहिले. महिला विभागात आर.के. स्पोर्ट्स पुलगाव (२७) व धाबेकर विद्यालय कारंजा लाड (२६) यांच्यात रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात पुलगाव संघ एका गुणाने विजयी झाला. शनिवारी सकाळाच्या सत्रात रंगलेल्या सामन्यात रेंज पोलीस (३०), प्रशिक्षण अकोला (३८) यांच्यात रंगलेल्या सामन्यात ८ गुणांची आघाडी घेत अकोला संघाने बाजी मारली. 

मराठा लायन्स नागपूर (३५ गुण), शिवाजी कोवरा (३६) यामध्ये शिवाजी संघाने बाजी मारली. न्यू ताज नागपूर (२८) व युवा संताजी सिटी भंडारा जिल्ह्यात रंगलेल्या सामन्यात नागपूर संघाने ३ गुणांनी विजय प्राप्त केला. यंग क्लब अकोला (१९)व  संभाजी क्रीडा कळंब (४५) यामध्ये कळंबने एकतर्फी विजय मिळविला. वर्धा पोलीस वर्धा (३३) व हनुमान संघ खामगाव (२६) संघात झालेल्या सामन्यात ७ गुणाने वर्धा संघाने विजय मिळविला. संघर्ष नागपूर (४३) व छत्रपती संघ अमरावती (२९) मध्ये रंगलेल्या सामन्यात नागपूरने भक्कम गुणांनी विजय संपादन केला. सिटी पोलीस नागपूर (३३) व वीर केसरी संघ नांदगाव पेठ (१२) यामध्ये नागपूरने बाजी मारली. 

युवा नवरंग अमरावती (१७) व जय बजरंग कारंजा (४३) यांच्यात झालेल्या  सामन्यांत सर्वाधिक गुणाने कारंजा संघाने विजय मिळविला. पठाणपुरा चंद्रपूर (३४) व जागृती आर्वी (३०) मध्ये रंगलेल्या सामन्यांत चंद्रपूर संघाने ४ गुणांनी बाजी मारली. वृत्त लिहिस्तोवर इतर संघांचे सामने सुरू होते. सामने पाहण्यासाठी राजकीय पदाधिकाºयांनी मैदानाला भेटी दिल्यात.   पुरुष गटातील २६, तर महिला गटातील १६ संघांत सदर सामने रंगणार आहेत.

Web Title: State level Kabaddi competition: Pulgaon team defeats Amravati team with one points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.