‘राज्य क्रीडा संघटनांनाही आचारसंहिता’
By admin | Published: November 15, 2016 11:54 PM2016-11-15T23:54:09+5:302016-11-15T23:54:09+5:30
राष्ट्रीय क्रीडा आचारसंहिता राज्य क्रीडा संघटनांनाही लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य क्रीडामंत्री व सचिवांसमवेत चर्चा
नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा आचारसंहिता राज्य क्रीडा संघटनांनाही लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य क्रीडामंत्री व सचिवांसमवेत चर्चा सुुरू असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दिली.
गोयल म्हणाले, ‘राष्ट्रीय क्रीडा संघटनाबरोबर झालेल्या बैठकीत राज्य संघटनांनाही आचारसंहिता लागू करावी, असा प्रस्ताव आला. याबाबत आम्ही राज्यातील सचिव व मंत्र्यांशी चर्चा करून सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत.’ गोयल म्हणाले, ‘आम्ही टोकियो आॅलिम्पिकची तयारी सुरू केली आहे. टीओपी योजनेबाबत कोणाचीही तक्रार नव्हती. मात्र, अनेक खेळाडूंनी ही योजना लवकर का सुुरू केली नाही, असे विचारले. गोयल म्हणाले, ‘आॅलिम्पिकसाठी अजून चार वर्षांचा कालावधी असला तरी आम्ही पुढील वर्ष समोर ठेवून काम करत आहोत.’ (वृत्तसंस्था)