राज्यस्तरीय कुस्ती : संतोषकडून विक्रम पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 03:01 AM2017-12-25T03:01:41+5:302017-12-25T03:01:48+5:30

६१ व्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ९७ किलोच्या अंतिम फेरी अहमदनगरच्या संतोष गायकवाड व नांदेडच्या विक्रम वडतिलेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

State wrestling: Santosh Saxena beat Vikram | राज्यस्तरीय कुस्ती : संतोषकडून विक्रम पराभूत

राज्यस्तरीय कुस्ती : संतोषकडून विक्रम पराभूत

Next

गोरख माझिरे
भूगाव : ६१ व्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ९७ किलोच्या अंतिम फेरी अहमदनगरच्या संतोष गायकवाड व नांदेडच्या विक्रम वडतिलेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत प्रथम विक्रमने ताबा मिळवत दोन गुणांची कमाई केली. संतोषने विक्रमवर ताबा मिळवत दोन गुणांची कमाई केली. संतोषने नकारात्मक कुस्ती केल्याने व बाहेर ढकलल्याने विक्रमने दोन गुणांची कमाई केली. पुन्हा संतोषने विक्रमवर ताबा मिळवत दोन गुणांची कमाई केली. इतक्यात वेळ संपली. शेवटचा गुण संतोषने घेतल्याने त्यास पंचांनी विजयी केले. त्यास सुवर्ण व विक्रम वडतिलेस रौप्यपदक मिळाले.
९७ किलो ब्राँझपदकासाठी जागतिक शालेय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवणाºया प्रा. दिनेश गुंड यांचे सुपुत्र आदर्श गुंड याने व मुळशीचे सुपुत्र चेतन कंधारे यांनी विजय मिळवला. आदर्श गुंडने कोल्हापूरच्या ओंकार भातमारेला चितपट करीत विजय मिळवला, तर चेतन कंधारेने सोनबा कांबळेला (८-५) गुणांनी जिंकत ब्राँझपदकावर कमाई केली.
निकाल : ९७ किलो गादी विभाग : प्रथम - संतोष गायकवाड (अहमदनगर); द्वितीय - विक्रम वडतिले (नांदेड); तृतीय - आदर्श गुंड (पुणे जिल्हा) चेतन कंधारे (पुणे शहर)
९२ किलो गादी विभाग : प्रथम - हर्षवर्धन सदगीर (नाशिक जिल्हा); द्वितीय - सागर माने (सोलापूर जिल्हा); तृतीय - विक्रम पवळे (पुणे जिल्हा), विक्रम शेटे (अहमदनगर)
६५ किलो गादी विभाग : प्रथम - अक्षय हिरगुडे (कोल्हापूर); द्वितीय - शुभम थोरात (पुणे शहर); तृतीय - देवानंद पवार (लातूर), सागर लोखंडे (पुणे जिल्हा)
निकाल माती विभाग : ९७ किलो माती विभाग : प्रथम - तेजस वांजळे (पुणे शहर); द्वितीय - शंकर मोहिते (सांगली); तृतीय - प्रशांत शिंदे (सातारा)
९२ किलो माती विभाग : प्रथम - विक्रम घोरपडे (पुणे जिल्हा); द्वितीय - अनिल जाधव (नांदेड); तृतीय - अनिल ब्राम्हणे (अहमदनगर)
६५ किलो माती विभाग : प्रथम - क्रांतिकुमार पाटील (कोल्हापूर); द्वितीय - निखिल कदम (पुणे शहर); तृतीय - नामदेव दिवे (नाशिक शहर).

पैलवानकी पेशाला प्रोत्साहन द्यायचे काम भूगाव ग्रामस्थांनी केले आहे. कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांचे स्मरण करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. संपूर्ण भारत देशाचे या महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे लक्ष असते.
- मा. शरद पवार,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ
कुस्ती हा ऐतिहासिक खेळ आहे. त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.
- नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूकमंत्री

गादी व माती विभागातून एकूण ४४ संघ यात सहभागी झाले होते. राजर्षी शाहू महाराजांनंतर स्व. मामासाहेब मोहोळ यांनी कुस्ती जतन केली. शरद पवार तोच वारसा पुढे चालवत आहेत. हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी आदी पैलवान मंडळींना शासनाच्या वतीने मानधन देण्यात येत होते. मात्र आता ही योजना बंद होते की काय, अशी
शंका आहे. - बाळासाहेब लांडगे

Web Title: State wrestling: Santosh Saxena beat Vikram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.