IPL पासून दूर रहा, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दाखवले पैशांचे आमिष
By Admin | Published: May 12, 2017 06:50 PM2017-05-12T18:50:09+5:302017-05-12T19:01:38+5:30
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना आयपीएलपासून दूर ठेवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना घसघशीत कराराचे आमिष दाखवले आहे.
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 12 - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना आयपीएलपासून दूर ठेवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना घसघशीत कराराचे आमिष दाखवले आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार एप्रिल-मे मध्ये क्रिकेटचा मोसम नसतो. त्यावेळी खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. यावेळी खेळाडूंना दुखापती होण्याचा धोका असतो.
ज्याचा फटका ऑस्ट्रेलियन संघाला बसतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना घसघशीत रक्कमेला करारबद्ध करुन आयपीएलपासून दूर ठेवण्याची क्रिकेट ऑस्ट्रेलियाची योजना आहे. सध्या नव्या कॉन्ट्रॅक्टपद्धतीवरुन क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या संघटनेमध्ये वाद सुरु आहेत.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या सहभागामुळे आयपीएल स्पर्धा अधिक रंगतदार बनते. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नर हे ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलमध्ये पुणे आणि हैदराबाद संघाचे कर्णधार आहेत. वर्षाला ते 10 लाख डॉलरपेक्षा जास्त कमाई करतात. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जितके पैसे मिळतात त्यापेक्षा कैकपटींनी जास्त कमाई ते आयपीएलच्या एका मोसमात करतात.