तिन्ही प्रकारांत स्टीव्ह स्मिथ ‘बेस्ट’
By admin | Published: May 1, 2016 01:40 AM2016-05-01T01:40:09+5:302016-05-01T01:40:09+5:30
स्टीव्ह स्मिथ याने बॅटने चांगले योगदान दिले आहे. खेळातील त्याचा स्टान्स, क्रिजवर अनेकदा बॅटने रेषा ओढणे, स्वत:च्या हाताने हेल्मेट वारंवार व्यवस्थित करण्याचा अंदाज, शर्ट अॅडजेस्ट
- रवी शास्त्री लिहितो़...
स्टीव्ह स्मिथ याने बॅटने चांगले योगदान दिले आहे. खेळातील त्याचा स्टान्स, क्रिजवर अनेकदा बॅटने रेषा ओढणे, स्वत:च्या हाताने हेल्मेट वारंवार व्यवस्थित करण्याचा अंदाज, शर्ट अॅडजेस्ट करणे आणि नंतर चेंडू टोलविण्यासाठी थोडे पुढे येणे हे सर्व पाहता, त्याला खेळताना पाहून डेरेक रेंडल आणि शिवनारायण चंद्रपॉल यांच्या शैलीची आठवण होते.
स्मिथने लेग स्पिनर म्हणून करिअरला सुरुवात केली. नंतर स्वत:ला फ्रंटलाईन फलंदाज म्हणून सिद्ध केले. २०११च्या आयपीएल लिलावात त्याला कुणी खरेदीदेखील केले नव्हते. निळ्या डोळ्यांच्या न्यू साऊथ वेल्सच्या या खेळाडूला २०१३मध्ये आॅस्ट्रेलिया संघात संधी मिळाली. आॅस्ट्रेलियाने त्या वेळी भारत दौरा केला तेव्हा स्मिथला दोन कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. पण, त्यानंतर मात्र स्मिथने लक्ष वेधले.
भरभरून धावा काढणाऱ्या या खेळाडूचे कसब तिन्ही प्रकारांत संघासाठी उपयुक्त आहे. आयपीएलमध्ये गुजरात लायन्सविरुद्ध त्याने एक नवाच फटका विकसित केला. हा फटका म्हणजे दोन्ही पायाच्या मधून फ्लिक करणे. या शॉटदरम्यान पायांमध्ये अंतर ठेवून यॉर्कर चेंडू विकेटकीपर आणि लेग स्लिपमधून सीमापार टोलविला जातो.
स्मिथने चौफेर वर्चस्व राखून फटकेबाजी केली. त्याच्या खेळीत चौकार-षटकारांचीही उणीव नव्हती. त्याच्यापाठोपाठ महेंद्रसिंह धोनीच्या खेळीने चाहत्यांची मने जिंकली.
आयपीएलमध्ये नवे चित्र पाहायला मिळाले. भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांचे दोन दिग्गज कर्णधार एकमेकांना शाबासकी देत होते; शिवाय शॉट खेळताना एकमेकांशी चढाओढही करीत होते. पण, अखेर त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे पॉवर प्लेमध्ये धोकादायक फलंदाज असल्याने त्यांनी सामना खेचून नेला. चॅम्पियन्सला पराभव नकोसा होतो. स्मिथची खेळी पुण्याला जिंकविण्यासाठी होती; पण त्याचे प्रयत्न फळाला येऊ शकले नाहीत. यामुळे तो अधिक आक्रमक होईल. येत्या काही सामन्यांत अन्य संघांना त्याच्या फटकेबाजीचा रोष पाहायला मिळणार, हे निश्चित.
(टीसीएम)