स्टीव्ह स्मिथने कसोटीत 5000 धावांचा टप्पा केला पार
By admin | Published: March 16, 2017 06:30 PM2017-03-16T18:30:59+5:302017-03-16T18:30:59+5:30
भारत विरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने कसोटीतील 5000 धावांचा टप्पा पार करुन विक्रमाची नोंद केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 16 - भारत विरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने कसोटीतील 5000 धावांचा टप्पा पार करुन विक्रमाची नोंद केली.
रांची येथे सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिस-या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथने शानदार शतकी खेळी केली. त्याने आपल्या 53 व्या कसोटीत 97 डावात 5000 धावा पूर्ण केल्या. स्टीव्ह स्मिथला 5000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 76 धावांची गरज होती. ती आज झालेल्या सामन्यात पूर्ण करत त्याने 244 चेंडूत 13 चौकांरासह नाबाद 117 धावांची खेळी केली. जागतिक क्रमवारीत कसोटी सामन्यात 5000 धावा करणा-या फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथ सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. याचबरोबर सर्वाधिक जलद धावा करणा-या ऑस्ट्रेलियातील फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथ चौथ्या स्थानावर आहे.
दरम्यान, स्टीव्ह स्मिथच्या आधी कसोटीच्या क्रमवारीत, इंग्लंड - जॅक हॉब्स (55 कसोटी, 91 डाव), वेस्ट इंडिज - गॅरी सोबर्स (56 कसोटी, 95 डाव), भारत - सुनील गावस्कर (56 कसोटी, 95 डाव), वेस्ट इंडिज - विव रिचर्डस (64 कसोटी, 95 डाव), ऑस्ट्रलिया - मॅथ्यू हेडन (55 कसोटी, 95 डाव) यांचा समावेश आहे.