स्टीव्ह वॉ स्वार्थी क्रिकेटपटू - शेन वॉर्न
By Admin | Published: February 9, 2016 03:19 PM2016-02-09T15:19:04+5:302016-02-09T15:19:04+5:30
ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नच्या मनात आपला एकेकाळचा संघ सहकारी स्टीव्ह वॉ बद्दल जो राग, आकस आहे तो पुन्हा एकदा समोर आला आहे.
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. ९ - ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नच्या मनात आपला एकेकाळचा संघ सहकारी स्टीव्ह वॉ बद्दल जो राग, आकस आहे तो पुन्हा एकदा समोर आला आहे. मी ज्या क्रिकेटपटूंबरोबर खेळलो त्यात स्टीव्ह वॉ मी पाहिलेला सर्वात स्वार्थी क्रिकेटपटू आहे असा आरोप वॉर्नने टीव्ही चर्चेच्या एका कार्यक्रमात केला.
स्टीव्ह वॉ मला आवडता नाही त्यामागे अनेक कारणे आहेत. तो एक स्वार्थी क्रिकेटपटू आहे असे चॅनल टेनच्या कार्यक्रमात बोलताना वॉर्न म्हणाला.
१९९९ साली वेस्टइंडिज विरुध्दच्या अखेरच्या सामन्यात स्टीव्ह वॉ ने आपल्याला संघातून वगळल्याची आठवण वॉर्नने या कार्यक्रमात सांगितली. या मालिकेत ऑस्ट्रेलिया १-२ अशी पिछाडीवर होती.
मला ज्या सामन्यातून वगळले तेव्हा मी ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार होतो. टीम निवडण्यासाठी आम्ही टेबलावर बसलो त्यावेळी त्याने मला वगळण्याचा निर्णय जाहीर केला. मी त्याला विरोध केला. पण स्टीव्हने सांगितले मी कर्णधार आहे. तु संघात खेळणार नाही. मी त्याच्या निर्णयाने निराश झालो असे वॉर्नने सांगितले.