.. तरीही त्याने क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले
By Admin | Published: January 9, 2017 12:55 AM2017-01-09T00:55:21+5:302017-01-09T00:55:21+5:30
इंग्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी प्रथमच भारतीय संघात निवड झालेला युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या चर्चेत आहे.
नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी प्रथमच भारतीय संघात निवड झालेला युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या चर्चेत आहे. ऋषभने स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करीत निवड समितीचे लक्ष वेधले. आक्रमक फलंदाज असा लौकिक असल्यामुळे पंतची संघात वर्णी लागली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १०२ च्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राईक रेट १३० च्या जवळजवळ आहे. (वृत्तसंस्था)
विवाह समारंभ सोडून क्रिकेटच्या सरावाला
राजेंद्र पंत यांनी सांगितले की, ऋषभ बालपणापासून मेहनती आहे. लहानपणापासून त्याला क्रिकेटची आवड होती. शाळेतून आल्यानंतर तो घरी क्रिकेटचा सराव करीत होता. घरातील लोकांना तो गोलंदाजी करण्यास सांगत होता. तो चार-पाच वर्षांचा असताना त्याला कुटुंबातील एका विवाह समारंभासाठी घेऊन गेलो, पण काही वेळानंतर ऋषभ तेथे नव्हता. बराचवेळ शोधाशोध केल्यानंतर तो काही मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसला.
लंगरमध्ये जेवण अन गुरुद्वारामध्ये घेतला आसरा
01 - ऋषभ सरावादरम्यान गुरुद्वारामध्ये राहात होता आणि लंगरमध्ये भोजन करीत होता, अशी आठवण सरावासाठी ऋषभला रुडकीहून दिल्लीला यावे लागत होते. दिल्लीतील सोनेट क्लबचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी क्रिकेटपटूंसाठी एक प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.
02 - त्या शिबिरात सहभागी होण्यासाठी ऋषभ रुडकीतून दिल्लीला आला होता. चमकदार कामगिरीमुळे त्याची सोनेट अकादमीमध्ये निवड झाली. येथे दर शनिवारी व रविवारी प्रशिक्षण दिल्या जात होते. ऋषभ शनिवारी सरावानंतर रात्री मोतीबाग येथील गुरुद्वारामध्ये थांबत होता.
03 - रविवारी सकाळी लंगरमध्ये भोजन केल्यानंतर सरावासाठी सोनेट क्लबमध्ये जात होता. रविवारी सराव संपल्यानंतर तो रुडकीला परत येत होता. हा क्रम अनेक महिने सुरू होता. त्यानंतर ऋषभ दिल्लीतील छतरपूर परिसरात किरायाच्या घरात राहायला लागला.