स्टिंगने फोडले आयपीएलमधील भ्रष्टाचाराचे बिंग
By admin | Published: April 8, 2015 03:37 PM2015-04-08T15:37:29+5:302015-04-08T15:37:29+5:30
आयपीएलमधील अनागोंदी कारभाराची चर्चा रंगl असली तरी त्यासंदर्भातील पुरावे समोर आले ते २०१२ मध्ये.
Next
>आयपीएलमधील अनागोंदी कारभाराची चर्चा रंगl असली तरी त्यासंदर्भातील पुरावे समोर आले ते २०१२ मध्ये. एका हिंदी वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पाच खेळाडू भ्रष्टाचारात गुंतल्याचे उघड झाले. हा प्रकार समोर आल्याने आयपीएलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पाच खेळाडूंनी आयपीएलमध्ये भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली. संघमालकांकडून बोलीपेक्षा जास्त रक्कम मिळाल्याचे या स्टिंगमध्ये समोर आले. आयपीएलसोबतच स्थानिक स्पर्धांमध्येही भ्रष्टाचार होतो अशी धक्कादायक माहिती या स्टिंगमधून समोर आली. या स्टिंग ऑपरेशनमुळे मोहनिश मिश्रा, शलभ श्रीवास्तव, टी.पी. सुधींद्र, अमित यादव व अभिनव बाली यांच्यावर बीसीसीआयने कारवाई केली. स्टिंगच्या निमित्ताने आयपीएलचे बिंग फुटले व आयपीएल हा फक्त पैशाचा बाजार झाल्याचे उघड झाले.