स्टोक्सने रोखली मुंबई एक्स्प्रेस!

By admin | Published: April 25, 2017 01:00 AM2017-04-25T01:00:46+5:302017-04-25T06:45:12+5:30

टी-२० म्हणजे तडकून फलंदाजी. हे समीकरण मुंबई इंडियन्स-रायझिंग पुणे सुपरजायंट्स या सामन्याने पुन्हा मोडून काढलं.

Stokes interrupts Mumbai Express! | स्टोक्सने रोखली मुंबई एक्स्प्रेस!

स्टोक्सने रोखली मुंबई एक्स्प्रेस!

Next

सचिन कोरडे /ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25 - टी-२० म्हणजे तडकून फलंदाजी. हे समीकरण मुंबई इंडियन्स-रायझिंग पुणे सुपरजायंट्स या सामन्याने पुन्हा मोडून काढलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टीवर सोमवारी गोलंदाजी चमकली. पुणे संघाचे ६ बाद १६० धावांचे सहज वाटणारे लक्ष्य मुंबईसाठी कठीण होत गेले होते. शेवटच्या षटकापर्यंतची लढाई अखेर पुण्याने जिंकली. अवघ्या ३ धावांनी हा सामना जिंकत त्यांनी मुंबईची सलग ६ विजयांची मालिका ‘ब्रेक’ केली. बेन स्टोक्सचा मारा, इमरान ताहीरची फिरकी आणि सुंदरने पार्थिवच्या रुपात घेतलेला बळी लक्षवेधी ठरला. टी-२० क्रिकेटमधील हरभजनच्या २०० बळींच्या विक्रमाचा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करणयाची मुंबईकरांची संधी हुकली. या विजयानंतर पुणे संघ चौथ्या क्रमांकावर पोहचला. निश्चितच, याचे श्रेय पुण्याच्या गोलंदाजांना जाते.
मुंबईला १२ चेंडूंत २४ धावांची गरज होती. मैदानावर कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दीक पांड्या होते. अशा स्थितीत मुंबई हा सामना जिंकणार असेही वाटत होते. मात्र बेन स्ट्रोकचा मारा मुंबईचे फलंदाज सहज पेलू शकले नाही. त्याने केवळ ७ धावा दिल्या. पांड्या बाद झाल्यानंतर रोहितने एक षटकार लगावत रंगत आणली. त्यानंतर ३ चेंडूंत ११ धावांची गरज असताना रोहित बाद झाला आणि सामना पुण्याकडे झुकला. भज्जीने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला मात्र तोपर्यंत सामना पुण्याने जिंकला होता. मुंबईला सहज वाटणारे हे लक्ष्य पुण्याच्या गोलंदाजांनी आव्हानात्मक केले. पार्थिव (३३) बाद झाल्यानंतर मुबईचे फलंदाज मोक्याच्या क्षणी बाद झाले. रोहितची ३९ चेंडूंत ५८ धावांची खेळी वाया गेली.
त्याआधी, आक्रमक सुरुवात केलेल्या पुणेकरांना मोक्याच्या वेळी धक्के देत त्यांच्या धावगतीला लगाम घालण्यात मुंबईकरांना यश आले होते. त्यामुळे चांगल्या सुरुवातीनंतरही रायझिंग पुणे सुपरजायंट्सने निर्धारित २० षटकात ६ बाद १६० धावांची मजल मारली होती. वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल जिंकून मुंबई कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत धावांचा पाठलाग करण्यास पसंती दिली. कारण धावांचा पाठलाग करताना मुंबईने सामने जिंकले होते. दुसरीकडे रहाणे - राहुल त्रिपाठी या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांना कोणतीही दाद न देता दमदार अर्धशतकी सलामी दिली. मिशेल जॉन्सन, मिशेल मॅक्क्लेनघन, यंदाच्या मोसमात पहिलाच सामना खेळत असलेला कर्ण शर्मा, हुकमी जसप्रीत बुमराह व अनुभवी हरभजनसिंग असे सर्वजण धावा रोखण्यात अपयशी ठरत होते. परंतु, अखेर कर्ण शर्मानेच मुंबईला यश मिळवून देत धोकादायक रहाणेला तंबूचा रस्ता दाखवला. अजिंक्य ३२ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारांसह ३८ धावा करून परतला. यानंतर राहुल त्रिपाठीने सूत्रे आपल्याकडे घेत ३१ धावांत ३ चौकार व २ षटकारांसह ४५ धावा काढल्या. मात्र, कर्णधार स्टिव्ह स्मिथ (१७), गतसामन्यात निर्णयक फटकेबाजी करणारा महेंद्रसिंह धोनी (७), अष्टपैलू बेन स्टोक्स (१७) अपयशी ठरल्याने पुण्याची धावसंख्या मर्यादित राहिली होती.

 

Web Title: Stokes interrupts Mumbai Express!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.