इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट...

By admin | Published: July 12, 2016 08:59 PM2016-07-12T20:59:34+5:302016-07-12T22:02:24+5:30

पेले यांनी वयाच्या ७५व्या वर्षी तिसरे लग्न केल्यानंतर, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनीही आपल्या लग्नाची हॅट्ट्रीक केल्याचे वृत्त आहे.

The story of Imran Khan's third marriage ... | इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट...

इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट...

Next

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 12 - काही दिवसांपुर्वीच फुटबॉल विश्वातील महान खेळाडू पेले यांनी वयाच्या ७५व्या वर्षी तिसरे लग्न केल्यानंतर, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनीही आपल्या लग्नाची हॅट्ट्रीक केल्याचे वृत्त आहे. लंडनमध्ये अत्यंत साध्यापध्दतीने इम्रान तिसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढल्याची चर्चा आहे. दरम्यान, त्यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाने यात काहीही तथ्य नसल्याचे सांगितले आहे.
क्रिकेटपटू म्हणून आपली छाप पाडल्यानंतर इम्रान यांनी निवृत्तीनंतर राजकीय क्षेत्रात नवीन इनिंग सुरु केली. पीटीआय पक्षाचे अध्यक्ष असलेले ६३ वर्षीय इम्रान यांनी काही दिवसांपुर्वीच एका कार्यक्रमात, आपल्या तिसऱ्या लग्नाचे संकेत दिले होते. याआधी त्यांचा दोन घटस्फोट झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान यांनी जीच्याशी लग्न केले आहे, ती मेनका परिवाराशी संबंधित आहे. एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार मेनका पंजाब प्रांतातील एक प्रतिभाशाली परिवार आहे. तसेच अन्य प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार इम्रान आपली पत्नी आणि दोन मुलांसह सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसले. विशेष म्हणजे, इम्रान यांच्या तिसऱ्या पत्नीविषयी कोणतीही माहिती मिळत नसून, एका वृत्तवाहिनीने तीचे नाव मरियम असे सांगितले आहे.
त्याचवेळी, दुसरीकडे पीटीआय पक्षाने या सर्व वृत्तांकडे केवळ अफवा असल्याचे सांगत दुर्लक्ष केले आहे. लवकरच राजकिय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी इम्रान मायदेशी परततील, असेही पीटीआयने स्पष्ट केले. पक्षाचे केंद्रीय सूचना सचिव नईम उल हक यांनी सांगितले की, ह्यह्यहे सर्व खोटे आहे. आम्ही वृत्तवाहिन्या बघत असून खूप हसतोय.ह्णह्ण
इम्रान यांनी १९९५ साली सर्वप्रथम ब्रिटनच्या जेमिमा गोल्डस्मिथ (लग्नानंतर जेमिमा खान) हिच्याशी लग्न केले होते. मात्र २००४ साली दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर बीबीसीची सूत्रसंचालक रेहम खानसह लग्न केले. परंतु, हे लग्नही फारकाळ टिकले नाही. 

Web Title: The story of Imran Khan's third marriage ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.