बहुगुणी विकेटकिपर संघाची ताकद!
By admin | Published: May 8, 2016 03:08 AM2016-05-08T03:08:44+5:302016-05-08T03:08:44+5:30
गुजरातविरुद्ध ऋषभ पंतने शानदार फलंदाजी केली, त्या दिवशी दिल्ली संघात चार विकेटकिपर खेळत होते. त्यात पंतशिवाय डिकॉक, सॅमसन आणि बिलिंग्स यांचा समावेश होता.
- रवी शास्त्री लिहितो़...
गुजरातविरुद्ध ऋषभ पंतने शानदार फलंदाजी केली, त्या दिवशी दिल्ली संघात चार विकेटकिपर खेळत होते. त्यात पंतशिवाय डिकॉक, सॅमसन आणि बिलिंग्स यांचा समावेश होता. या संघाची ताकद फलंदाजी असल्याने हा निर्णय योग्यच होता. यष्टिरक्षक हा पंख नसलेल्या पक्ष्यासारखाच असतो. अनेक संघांत दीर्घकाळपासून हीच वृत्ती पाहायला मिळते. फलंदाज विकेटकिपरच्या भूमिकेत दिसतात. पण, आता काळ बदलला. यष्टिरक्षक बनण्यासाठी विशेष गुण असावे लागतात, हा समज बदलला. यामागे कारणही तसेच आहे. धावा काढल्याशिवाय आणि गडी बाद केल्याशिवाय तुम्ही स्कोअरशिटवर हजेरी लावू शकत नाही.
तज्ज्ञ यष्टिरक्षकाची उणीव जाणवली, असे कधीकधीच घडते. बॅँगलोरसोबत कोलकाताविरुद्धच्या सामन्यात असे घडले होते. चहलच्या षटकांत के. एल. राहुलने चूक केली. आंद्रे रसेलला यष्टिचीत करण्याची संधी राहुलने लेग स्टम्पबाहेरचा चेंडू योग्यरीत्या न पकडल्याने गमावली. या चुकीमुळे अवांतर पाच धावा गेल्या. बॅँगलोरच्या याच चुकीमुळे कोलकाता संघाने सामना जिंकला. खेळपट्टी जुनी झाली की फिरकी गोलंंदाज प्रभावी ठरतात. अशा वेळी यष्टीमागे उभे राहणे सोपे नसते. फिरकी गोलंदाजाच्या हाताकडे त्याला नजर ठेवावी लागते. फिरकी गोलंदाजाचा हात पाहून चेंडूचा वेध घ्यावा लागतो. हे काम वाटते तितके सोपे नाही. काही यष्टिरक्षक मंदगतीने काम करतात, हे मी आधीच सांगितले . सेकंदाच्या शंभराव्या क्षणाला धावबाद करावे लागते. अशा वेळी यष्टीमागे जोश लागतो. नियमित विकेटकिपर नसेल, तर हे काम कठीण होऊन बसते. यामुळेच केकेआरने उर्वरित सामन्यांसाठी
रॉबिन उथप्पाला मार्गदर्शन करण्यासाठी मार्क बाऊचरला पाचारण केले
आहे. (टीसीएम)