शारजील, लतिफ यांच्याविरुद्ध सबळ पुरावे : पीसीबी

By admin | Published: May 10, 2017 12:59 AM2017-05-10T00:59:52+5:302017-05-10T00:59:52+5:30

स्पॉट फिक्सिंग व अन्य प्रकरणात पाकिस्तानचा फलंदाज शारजील खान आणि खालिद लतिफ यांच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याचे

Strong evidence against Sharjel, Latif: PCB | शारजील, लतिफ यांच्याविरुद्ध सबळ पुरावे : पीसीबी

शारजील, लतिफ यांच्याविरुद्ध सबळ पुरावे : पीसीबी

Next

कराची : स्पॉट फिक्सिंग व अन्य प्रकरणात पाकिस्तानचा फलंदाज शारजील खान आणि खालिद लतिफ यांच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे विधी सल्लागार तफज्जुल रिज्वी यांनी म्हटले आहे. रिज्वी म्हणाले, ‘दूरध्वनीवरील संभाषण, एसएमएसच्या स्वरूपात उपलब्ध पुराव्यांची फोरेन्सिक चाचणी झाली असून खेळाडूंविरुद्ध कारवाई व स्पॉट फिक्सिंग आरोपांच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या लवादापुढे सर्वकाही सिद्ध करण्यासाठी हे पुरावे पुरेसे आहेत.’ रिज्वी यांच्या मते दोन्ही खेळाडू लवादाला चुकीची माहिती देत आहेत. दोन्ही खेळाडूंच्या वकिलांनी सांगितले की, पीसीबीकडे आमच्या पक्षकारांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत.

Web Title: Strong evidence against Sharjel, Latif: PCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.