पोलंडचा जाता जाता बलाढ्य इराणला धक्का

By admin | Published: October 18, 2016 04:27 AM2016-10-18T04:27:23+5:302016-10-18T04:27:23+5:30

पोलंडने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात बलाढ्य इराणला ४१-२५ असा धक्का देत ‘ब’ गटात खळबळ माजवली.

Strong Iran shocks Poland | पोलंडचा जाता जाता बलाढ्य इराणला धक्का

पोलंडचा जाता जाता बलाढ्य इराणला धक्का

Next


अहमदाबाद : विश्वचषक कबड्डी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या पोलंडने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात बलाढ्य इराणला ४१-२५ असा धक्का देत ‘ब’ गटात खळबळ माजवली. त्याचवेळी उपांत्य फेरी निश्चित केलेल्या इराणसाठी हा पराभव धोक्याचा इशारा देणारा ठरला.
सावध सुरुवात केलेल्या पोलंडने हळूहळू आपला वेग वाढवताना इराणवर वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली. या सामन्यात इराणला लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. विशेष म्हणजे एकदाही इराणला पोलंडवर लोण चढवता आला नाही.
दुसरीकडे, पोलंडने इराणवर दोन लोण चढवून लक्षवेधी खेळ केला. पोलंडचा कर्णधार मायकल स्पिक्झोने जबरदस्त अष्टपैलू खेळ करताना चढाईमध्ये ८, तर बचावामध्ये
४ गुणांची कमाई करून निर्णायक भूमिका बजावली. पिओत्र
पामुलाक यानेही चढाईमध्ये ९
गुणांची कमाई करताना मायकलला चांगली साथ दिली. दुसरीकडे, इराणकडून घोलम्बासने एकाकी
लढत देत ७ गुणांची कमाई केली,
तर कर्णधार मेराज शेख आणि
फझेल अत्राचली या हुकमी
खेळाडूंचे अपयश इराणला महागात पडले. मेराजला केवळ एक गुण घेता आला, तर अत्राचलीने अष्टपैलू
खेळ केला, परंतु त्याला केवळ ४ गुणांवर समाधान मानावे लागले. मध्यंतराला पोलंडने १७-१४
अशी आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व राखले होते. (वृत्तसंस्था)
>कांगारूंचा फडशा... बांगलादेशने तुफानी विजय मिळवताना दुबळ्या आॅस्टे्रलियाचा अत्यंत एकतर्फी लढतीत ८०-८ असा तब्बल ७२ धावांनी फडशा पाडला. या विक्रमी विजयाच्या जोरावर बोनस गुणाची कमाई करून बांगलादेशने ‘अ’ गटात तिसऱ्या स्थानी झेप घेतली. उपांत्य फेरीसाठी बांगलादेशला अखेरच्या सामन्यात अर्जेंटिनाला नमवणे अनिवार्य असून त्याचवेळी त्यांना भारताचा इंग्लंडविरुद्ध पराभव आवश्यक आहे. मध्यंतराला बांगलादेशने ३६-२ अशी आघाडी घेत विजयाची औपचारिकता बाकी ठेवली होती. कर्णधार अरुदुझामन मुन्शी (१७) आणि साबुज मिया (१०) यांनी एकहाती वर्चस्व राखत कांगारुंची शिकार केली.

Web Title: Strong Iran shocks Poland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.