बलाढ्य मुंबई ‘बॅकफूट’वर

By admin | Published: January 12, 2017 01:31 AM2017-01-12T01:31:32+5:302017-01-12T01:31:32+5:30

पहिला डाव स्वस्तात गुंडाळला गेल्यानंतर गोलंदाजांचा सुमार कामगिरीचा फटका बसल्याने गतविजेते मुंबईकर रणजी अंतिम सामन्याच्या

Strong Mumbai on 'Backfoot' | बलाढ्य मुंबई ‘बॅकफूट’वर

बलाढ्य मुंबई ‘बॅकफूट’वर

Next

इंदूर : पहिला डाव स्वस्तात गुंडाळला गेल्यानंतर गोलंदाजांचा सुमार कामगिरीचा फटका बसल्याने गतविजेते मुंबईकर रणजी अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुजरातविरुध्द बॅकफूटवर आले. मुंबईचा डाव पहिल्या दिवशी २२८ धावांवर संपुष्टात आणल्यानंत गुजरातने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद २९१ धावांची मजल मारत ६३ धावांची निर्णायक आघाडी मिळवली आहे. अजूनही त्यांचे ४ फलंदाज बाद होण्याचे बाकी आहेत. कर्णधार पार्थिव पटेल (९०) आणि मनप्रित जुनेजा (७७) यांनी गुजरातला आघाडी मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.
होळकर स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी मुंबईला मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुजरातने सावध सुरुवात केली. त्यात समित गोहेल (४) आणि प्रियांक पांचाळ (६) या दोन्ही सलामीवीरांना झटपट बाद केल्यानंतरही मुंबईकरांना पकड मिळवण्यात अपयश आले. भार्गव मेराई आणि पार्थिव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. अभिषेक नायरने भार्गवला बाद करुन ही जोडी फोडली. भार्गवने १०० चेंडूत ७ चौकारांसह ४५ धावा काढल्या.
यानंतर, पार्थिव - मनप्रित जुनेजा या जोडीने चांगलाच जम बसवताना मुंबईकरांना घाम गाळण्यास लावले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२० धावांची महत्वपुर्ण भागीदारी केली. पुन्हा एकदा नायर मुंबईसाठी मोलाचा बळी मिळवताना पार्थिवला बाद केले. १४६ चेंडूत १२ चौकारांसह ९० धावा करुन पार्थिव ‘नर्व्हस नाइंटी’चा बळी ठरला. नंतर जुनेजाही शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने शतक ठोकण्यात अपयशी ठरला. त्याने ९५ चेंडूत ११ चौकारांसह शानदार ७७ धावांची खेळी केली.
जुनेजानंतर रुजुल भट ३८ चेंडूत ४ चौकारांसह २५ धावा काढून परतला. त्याला बलविंदर संधूने तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर चिराग गांधी (१७*) आणि रुष कलारिया (१६*) यांनी दिवसअखेरपर्यंत नाबाद राहताना गुजरातची आघाडी वाढवली. मुंबईकडून अभिषेक नायरने यशस्वी मारा करताना ९१ धावांत ३ बळी घेतले. तर, शार्दुल ठाकूर (२/६७), बलविंदर संधू (१/५४) यांनीही चांगला मारा केला. (वृत्तसंस्था)
जीवदान महागात पडले...
७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणारा मनप्रित जुनेजा याला मिळालेले जीवदान मुंबईला महागात पडले. जुनेजा वैयक्तिक १५ धावांवर खेळत असताना, नायरच्या गोलंदाजीवर शॉर्ट मिडविकेटला उडालेला त्याचा झेल श्रेयश अय्यरने सोडला.या जीनदानाचा जुनेजाने पुरेपूर फायदा घेताना शानदार अर्धशतकासह कर्णधार पार्थिवसह महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी केली.
धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ८३.५ षटकात सर्वबाद २२८ धावा.
गुजरात (पहिला डाव) : समित गोहेल झे. यादव गो. ठाकूर ४, प्रियांक पांचाळ झे. तरे गो. नायर ६, भार्गब मेराई झे. तरे गो. नायर ४५, पार्थिव पटेल झे. तरे गो. नायर ९०, मनप्रित जुनेजा झे. व गो. ठाकूर ७७, रुजुल भट झे. शॉ गो. संधू २५, चिराग गांधी खेळत आहे १७, रुष कलारिया खेळत आहे १६. अवांतर - ११. एकूण : ९२ षटकात ६ बाद २९१ धावा.
गोलंदाजी : शार्दुल ठाकूर २३-४-६७-२; बलविंदर संधू २१-२-५४-१; अभिषेक नायर
२७-६-९१-३; विजय गोहिल ८-०-३४-०; विशाल दाभोळकर ९-३-२१-०; सिद्धेश लाड
४-०-१८-०.

Web Title: Strong Mumbai on 'Backfoot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.