न्यूझीलंडचा जोरदार सराव

By admin | Published: March 11, 2016 03:40 AM2016-03-11T03:40:55+5:302016-03-11T03:40:55+5:30

धडाकेबाज कॉलिन मुन्रो (६७) आणि कोरी अँडरसन (६०) यांच्या तुफानी फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक सराव सामन्यात

Strong practice of New Zealand | न्यूझीलंडचा जोरदार सराव

न्यूझीलंडचा जोरदार सराव

Next

मुंबई : धडाकेबाज कॉलिन मुन्रो (६७) आणि कोरी अँडरसन (६०) यांच्या तुफानी फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक सराव सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ७४ धावांनी सहज विजय मिळवला.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करून निर्धारित षटकात लंकेसमोर २२७ धावांचे कठीण आव्हान ठेवले. या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २० षटकांत ७ बाद १५२ धावा असा रोखला गेला. पहिल्या डावात गोलंदाजी सपशेल अपयशी ठरल्यानंतर लंकेची फलदाजीही फारशी चमकदार ठरली नाही. लाहिरु थिरीमाने (२९ चेंडूत ४१ धावा) व चमारा कपुगेदरा (२७ चेंडूत ३८ धावा) यांनी लंकेकडून फटकेबाजीचा प्रयत्न केला. तर अ‍ॅडम मिल्ने (३/२६) आणि ईश सोधी (२/१९) यांनी लंकेच्या फलंदाजांना जखडवून ठेवले.
तत्पूर्वी श्रीलंकेच्या मर्यादा किवी फलंदाजांनी स्पष्ट करताना ५ फलंदाजांच्या मोबदल्यात २२६ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार केन विलियम्सन लवकर बाद झाल्यानंतर मार्टिन गुप्टील आणि मुन्रो यांनी ४१ धावांची वेगवान भागीदारी केली. गुप्टील २५ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ४१ धावा काढून बाद झाला. यानंतर मुन्रोने कोरी अँडरसनसह ९१ धावांची वेगवान भागीदारी केली. मुन्रोने दासून शनाका टाकत असलेल्या १०व्या षटकांतील पहिल्या चार चेंडंूवर षटकार खेचून तुफानी हल्ला केला. तर दुसरीकडे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या अँडरसनने ‘घरच्या’ मैैदानावर लंका गोलंदाजी फोडण्यास सुरुवात केली. मुन्रोने ३४ चेंडूत एकही चौकार न मारता ७ उत्तुंग षटकार खेचत ६७ धावांचा तडाखा दिला़
, तर अँडरसनने केवळ २९ चेंडूत ४ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करून ६० धावा कुटल्या. श्रीलंकेकडून शनाकाने २ बळी घेतले, तर सुरंगा लकमल एक बळी घेण्यात यशस्वी ठरला. कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने एकूण सहा गोलंदाज वापरले; मात्र त्यांची गोलंदाजी किवी हल्ल्यापुढे सपशेल अपयशी ठरली. (क्रीडा प्रतिनिधी)संक्षिप्त धावफलक :
न्यूझीलंड : २० षटकांत ५ बाद २२६ धावा (कॉलिन मुन्रो ६७, कोरी अँडरसन ६०, मार्टिन गुप्टील ४१; दासुन शनाका २/३७) वि.वि. श्रीलंका : २० षटकांत ७ बाद १५२ धावा (लाहिरु थिरीमाने ४१, चमारा कापुगेदरा ३८; अ‍ॅडम मिल्ने ३/२६, ईश सोधी २/१९).

Web Title: Strong practice of New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.