विदेशात यश मिळाल्यास भारताचा बलाढ्य संघात समावेश
By admin | Published: April 6, 2017 04:20 AM2017-04-06T04:20:06+5:302017-04-06T04:20:06+5:30
विराट कोहली अॅण्ड कंपनीने इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियात घरच्या मैदानावर सुरेख कामगिरी करीत मालिका जिंकल्या.
मुंबई : विराट कोहली अॅण्ड कंपनीने इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियात घरच्या मैदानावर सुरेख कामगिरी करीत मालिका जिंकल्या. विदेशात या कामगिरीत सातत्य कायम राहिल्यास भारताची बलाढ्य संघात गणना होऊ शकेल, असे वेस्ट इंडिजचे महान खेळाडू सर विव्हियन रिचर्डस् यांनी म्हटले आहे.
‘किंग रिचर्डस्’ हे फलंदाजीसाठी ख्यातिप्राप्त होते. त्यांनी कोहलीच्या आक्रमकतेचे समर्थन केले आहे. अलीकडे भारताने न्यूझीलंड, इंग्लंड, बांगला देश आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध १३ पैकी दहा कसोटी सामने जिंकले आहेत. यासंदर्भात रिचर्डस् म्हणाले,‘ भारताचे स्थानिक खेळपट्ट्यांवरील यश नजरेत भरण्यासारखे आहे. विदेशात इंग्लंड व आॅस्ट्रेलियाविरुद्ध कामगिरीची पुनरावृत्ती झाल्यास हा संघ महान संघांच्या पंक्तीत बसू शकेल.’ (वृत्तसंस्था)