नाणोफेक हरलो ते चांगलेच झाले : स्टुअर्ट ब्रॉड

By admin | Published: August 9, 2014 12:27 AM2014-08-09T00:27:17+5:302014-08-09T00:27:17+5:30

पहिल्या 3 कसोटींत चांगली कामगिरी करू न शकलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने चौथ्या कसोटीत मात्र आपल्या कामगिरीचा ‘कॅनव्हास ब्रॉड’ केला. 2

Stuart Broad | नाणोफेक हरलो ते चांगलेच झाले : स्टुअर्ट ब्रॉड

नाणोफेक हरलो ते चांगलेच झाले : स्टुअर्ट ब्रॉड

Next
>मँचेस्टर : पहिल्या 3 कसोटींत चांगली कामगिरी करू न शकलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने चौथ्या कसोटीत मात्र आपल्या कामगिरीचा ‘कॅनव्हास ब्रॉड’ केला. 28 वर्षीय ब्रॉडने 25 धावांत 6 बळी घेत अँडरसनच्या मदतीने भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारताच्या दुर्दशेला नाणोफेक जिंकून फलंदाजी घेण्याचा धोनीचा निर्णय कारणीभूत आहे, असे जर समजत असाल तर ब्रॉडचे म्हणणो ऐका. तो म्हणतो, आम्ही नाणोफेक हरलो आणि पहिल्यांदा गोलंदाजी करायची आहे, हे ऐकून मी निराश झालो होतो. या खेळपट्टीवर आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करण्यास प्राधान्य दिले असते; पण आम्ही नाणोफेक हरलो आणि पहिल्यांदा गोलंदाजी करावी लागली, एका अर्थाने हे चांगलेच झाले. आमच्या सुदैवाने आकाश ढगाळ होते. या आयडियल कंडिशनमध्ये आम्ही आमची लेंग्थ चांगली ठेवली. पहिल्या 13 चेंडूंत 4 फलंदाज बाद झाल्यावर भारतीय संघाकडे करण्यासारखे फारसे काही उरले नव्हते, असेही ब्रॉड म्हणाला. 
ब्रॉड म्हणाला, अँडरसन नेहमीसारखाच चांगल्या :िहदममध्ये होता. त्याचीही दुस:या बाजूने चांगली मदत झाली. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन आश्विन याच्या मते, फलंदाजीस परिस्थिती अनुकूल नव्हती, तरीही आम्ही आणखी धावा करायला हव्या होत्या. धोनीला आदल्या दिवशी डीहायड्रेशनचा त्रस झाला होता, म्हणून तो सारखा ड्रेसिंग रूमकडे येत होता, अशी माहितीही आश्विनने दिली. (वृत्तसंस्था)
 
भारतीय संघाला आम्ही फ्रंटफूटवर खेळण्यास भाग पाडले. उर्वरित काम चेंडूने केले. आमच्या क्षेत्ररक्षकांनीही चांगले ङोल घेतले. -स्टुअर्ट ब्रॉड

Web Title: Stuart Broad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.