शैली फ्रेजरने घडविला इतिहास
By Admin | Published: August 25, 2015 04:17 AM2015-08-25T04:17:18+5:302015-08-25T04:17:18+5:30
जमैकाच्या उसेन बोल्टनंतर त्यांच्याच देशाच्या शैली एन. फ्रेजर प्राइसने महिलांची १०० मीटर धावण्याची र्शर्यत १०.७६ सेकंदात जिंकून जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत वेगवान
जागतिक अॅथलेटिक्स : तिसऱ्यांदा जिंकले सुवर्ण
बीजिंग : जमैकाच्या उसेन बोल्टनंतर त्यांच्याच देशाच्या शैली एन. फ्रेजर प्राइसने महिलांची १०० मीटर धावण्याची र्शर्यत १०.७६ सेकंदात जिंकून जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत वेगवान धावपटूचा मान सलग तिसऱ्यांदा जिंकून इतिहासाची नोंद केली.
बर्डनेस्ट स्टेडियमच्या ट्रॅकवर सोमवारी शैलीने शर्यत सुरु झाल्यापासून आघाडी घेवून सुवर्णपदक आपल्या नावे केले. माजी हेप्टॉथलॉन खेळाडू हॉलंडच्या दाफने शिपर्सने १०.८१ सेकंदाची वेळ
नोंदवित त्यांच्या राष्ट्रीय विक्रमाची
नोंद केली. अमेरिकेच्या टोरी बावीने १०.८६ सें. वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले. शैलीने २००९ व २०१३ मध्ये सुद्धा सुवर्णपदक जिंकले होते.
(वृत्तसंस्था)