सबज्युनिअर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत मुंबई, अकोला, अहमदनगर, जळगाव उपांत्य फेरीत
By Admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:16+5:302015-02-14T23:51:16+5:30
औरंगाबाद : जिल्हा संघटना व नारायण व्यायामशाळा व क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेच्या २0 व्या सबज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत नवी मुंबई, अकोला मनपा, अहमदनगर, जळगाव मनपा संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली.
औ ंगाबाद : जिल्हा संघटना व नारायण व्यायामशाळा व क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेच्या २0 व्या सबज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत नवी मुंबई, अकोला मनपा, अहमदनगर, जळगाव मनपा संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली.स्पर्धेचे उद्घाटन भारतीय युवा इंटक संघटनेचे अध्यक्ष राकेश शेट्टी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सेंट्रल एक्साईजचे कमिश्नर सचिन भोसले, मनपाचे आरोग्य सभापती पुष्पा सलामपुरे, देवा सलामपुरे, संजय वळतकर, डॉ. प्रदीप तळवेलकर, सूरज येवतीकर, गोकुळ तांदळे, नाजूकराव पटवाले, प्रशांत जगताप, नितीन पाटील, किशोर चौधरी, त्रिभुवनसिंग, हेमंत देशपांडे, संदीप लंबे आदी उपस्थित होते.या स्पर्धेत २५ जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलिंद तळेले, उल्हास ठाकरे, प्रसाद यादव, पीयूष चांदेकर, शेखर चौगुले, कल्पेश चव्हाण, जयेश मोरे, सुमेध तळवेलकर, अक्षय येवले, विजय माळे, प्रशांत कदम, हर्षल मोरे, प्रीतीश पाटील, विनायक गुंड, स्वप्नील राऊत, अमित झाडे, सुशील गजभिये आदी परिश्रम घेत आहेत.निकाल : जळगाव विजयी वि. उल्हासनगर, अकोला जिल्हा वि.वि. ठाणे, कोल्हापूर वि.वि. मुंबई शहर, अकोला मनपा वि.वि. सांगली, सोलापूर जिल्हा वि.वि. मुंबई उपनगर, नाशिक वि.वि. कल्याण डोंबिवली मनपा, पुणे वि.वि. यवतमाळ, अमरावती वि.वि. गोंदिया, जळगाव मनपा वि.वि. सोलापूर मनपा, अकोला जिल्हा वि.वि. नागपूर मनपा, कोल्हापूर वि.वि. परभणी, नवी मुंबई वि.वि. सांगली, मुंबई उपनगर वि.वि. औरंगाबाद, नाशिक वि.वि. वर्धा, अहमदनगर वि.वि. यवतमाळ, बीड वि.वि. अमरावती, सोलापूर मनपा वि.वि. उल्हासनगर, ठाणे बरोबरी वि.वि. नागपूर मनपा, मुंबई शहर वि. वि. परभणी, अकोला मनपा वि.वि. नवी मुंबई, सोलापूर जिल्हा वि.वि. औरंगाबाद, अहमदनगर वि.वि. पुणे, बीड वि.वि. गोंदिया, केडीएमसी वि.वि. जळगाव जिल्हा, वर्धा वि.वि. जळगाव जिल्हा, नाशिक वि.वि. जळगाव जिल्हा. उद्या उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने खेळवण्यात येणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)