३५0 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी तिसऱ्यांदा पाठलाग

By admin | Published: January 16, 2017 05:16 AM2017-01-16T05:16:08+5:302017-01-16T05:16:08+5:30

भारताने तिसऱ्यांदा ३५0 पेक्षा जास्त लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग केला

A successful third run chase of 350 runs | ३५0 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी तिसऱ्यांदा पाठलाग

३५0 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी तिसऱ्यांदा पाठलाग

Next


पुणे- भारताने तिसऱ्यांदा ३५0 पेक्षा जास्त लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग केला आणि योगायोगाने तिन्ही वेळेस कोहलीने शतक ठोकले. याआधी २0१३ मध्ये भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध जयपूर आणि नागपूर येथे ३५0 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करीत विजय मिळविला.
१६ आॅक्टोबर २0१३ मध्ये भारताने जयपूर येथील सामन्यात आॅस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले ३६0 धावांचे लक्ष्य ४३.३ षटकांत १ बाद ३६२ धावा करीत पूर्ण केले. या सामन्यात रोहित शर्माने १४१ आणि विराट कोहलीने १00 धावा केल्या होत्या.
त्याचप्रमाणे नागपूर येथे ३0 आॅक्टोबर २0१३ मध्ये आॅस्ट्रेलियाने दिलेले ३५१ धावांचे टार्गेट भारताने ४९.३ षटकांत पूर्ण केले होते. या लढतीत विराट कोहलीने ११५ व शिखर धवनने १00 धावा केल्या होत्या.
वनडे इतिहासात सर्वांत जास्त धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेने १२ मार्च २00६ मध्ये आॅस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले ४३५ धावांचे आव्हान ४९.५ षटकांत ९ गडी गमावून ४३८ धावा करीत पूर्ण केले.
>हा विजय अविस्मरणीय आहे. आम्ही साडेतीनशे धावा दिल्या आणि ६३ धावांत आमचे ४ फलंदाज बाद झाले होते. खरं तर त्यावेळीही मी सामना जिंकण्याचा विचार करीत होतो. आम्ही केदारची क्षमता यापूर्वीही पाहिली आहे. तो चांगले फटके मारत होता. मी त्याला सांगितले फक्त आपण फक्त १५0 पर्यंत टिकलो तर विरोधी संघ डगमगेल. केदारने अतिशय उत्तम खेळी केली. मी त्या धावांसाठी खूप पळवले. प्रतिस्पर्धी संघाला आम्हाला दाखवून द्यायचे होते की, आमच्यात विजयाचा विश्वास आहे. - विराट कोहली, कर्णधार भारत
>इतकी मोठी धावसंख्या उभी करुनही पराभूत होणे निराशाजनक आहे. ४ बाद ६३ धावा असताना आम्ही वरचढ होतो. पण केदार-विराटने सामना खेचून घेतला, म्हणूनच हा पराभव पचवणे जड जात आहे. -इयोन मोर्गंन, कर्णधार इंग्लंड
>देशासाठी विजयी कामगिरी करणे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. विशेषत: माझ्या शहरात ही कामगिरी झाली. आज या सामन्यासाठी माझे आई, बाबा, पत्नी आणि मुलगी उपस्थित आहेत. त्यांच्या साक्षीने आज हे घडले. कर्णधार कोहलीने मोठया लक्ष्याचा पाठलाग करताना कसे खेळावे याचे उदाहरण अनेकदा घालून दिले आहे. विराटची फलंदाजी नॉन स्ट्रायकर एंडवरुन पाहण्याची संधी मी अनेकदा गमावली आहे. त्याच्यासोबत पळणे खूपच मुश्किल आहे. परंतु यापुढे तयार असेन. -केदार जाधव, सामनावीर
>३३८ ही इंग्लंडची भारताविरुध्द सर्वोच्च धावसंख्या होती. २0११ मध्ये बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ही धावसंख्या त्यांनी उभारली होती. हा सामना टाय झाला होता.१0५ धावांचा पाऊस इंग्लंडने रविवारी शेवटच्या आठ षटकांत पाडला. यामुळे ५ बाद २४५ वरून इंग्लंडची धावसंख्या ७ बाद ३५0 अशी पोहोचली. ३३ चेंडूंत इंग्लंडच्या बेन स्टोक्सने अर्धशतक केले. भारताविरुध्द इंग्लिश फलंदाजाने केलेले हे सर्वांत जलद अर्धशतक ठरले. यापूर्वी हा विक्रम ओवेश शहा आणि अँड्र्यू फ्लिंटॉपच्या नावावर होता. त्यांनी ३५ चेंडूत अर्धशतक केले होते.

Web Title: A successful third run chase of 350 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.