महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या अध्यक्षपदी सुधाकर शानबाग, तर सचिवपदी राजेंद्र पालकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 07:36 PM2018-10-28T19:36:20+5:302018-10-28T19:37:21+5:30

ही कार्यकारीणी 2018 ते 2022 या चार वर्षांच्या कालावधीसाठी कामकाज करणार आहे. या सभेला 25 जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Sudhakar Shanbagh as President of Maharashtra State Amateur Swimming Association; Rajendra Palkar as Secretary | महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या अध्यक्षपदी सुधाकर शानबाग, तर सचिवपदी राजेंद्र पालकर

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या अध्यक्षपदी सुधाकर शानबाग, तर सचिवपदी राजेंद्र पालकर

googlenewsNext
ठळक मुद्देसचिवपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजेंद्र पालकर यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या कार्यकारणीमध्ये साताऱ्याचे सुधाकर शानबाग यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यकारीणीच्या सचिवपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजेंद्र पालकर यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. ही कार्यकारीणी 2018 ते 2022 या चार वर्षांच्या कालावधीसाठी कामकाज करणार आहे. या सभेला 25 जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शानबाग यांच्या अध्यक्षतेखाली आज वार्षिक सर्वसाधारण सभा बोलण्यात आली होती. या सभेचे निरिक्षक म्हणून जिल्हा सत्र न्यायालयाचे माजी न्यायधिश के. डी. पाटील उपस्थित होते. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे खजिनदार धनंजय भोसले यावेळी उपस्थित होते.

कार्यकारीणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष- सुधाकर शानबाग.
उपाध्यक्ष - आनंद माने, लक्ष्मीकांत खंडागळे, भास्कर कुलकर्णी, विजय आघाव.
सचिव - राजेंद्र पालकर.
खजिनदार - पांडुरंग म्हात्रे.
सहसचिव - घनश्याम कुंवर, मनीषा बेडगे.
सदस्य - अनिल परचुरे, रवींद्र जामजारे, मनोज व्यवहारे, चेतन मानकर, प्रवीण लामखेडे, नंदन वर्तक, राजेश मोरे, रामदास ढमाले, संजय शिंदे, धनंजय फडके, सुनील उईके, ह्रदय बागवे, श्रीकांत बल्की.

Web Title: Sudhakar Shanbagh as President of Maharashtra State Amateur Swimming Association; Rajendra Palkar as Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.