सुरक्षित आयोजन जगाला दाखवू : सुगा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 08:44 AM2021-07-21T08:44:40+5:302021-07-21T08:45:02+5:30
जपानमध्ये ऑलिम्पिकचे किती सुरक्षित आयोजन होऊ शकते हे जगाला दाखवून देऊ, असा दावा आयोजन समितीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
टोकियो: जपानमध्ये ऑलिम्पिकचे किती सुरक्षित आयोजन होऊ शकते हे जगाला दाखवून देऊ, असा दावा आयोजन समितीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कोरोना संकटात हजारो खेळाडू, अधिकारी, सपोर्ट स्टाफ आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी जपानमध्ये दाखल झाले. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आयओसी सदस्यांच्या बैठकीत म्हणाले, ‘जग समस्याग्रस्त आहे. अशावेळी आमच्या समोर ऑलिम्पिक यशस्वी करण्याचे आव्हान आहे.‘ आरोग्य आणि सुरक्षेचे उपाय योजून आयोजन यशस्वी करणार आहोत.’ जपानमध्ये आयोजनास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. आयओसी प्रमुख थॉमस बाक यांना देखील याचा फटका बसला होता.
खेळाडू, स्वयंसेवकासह नऊ जण बाधित
कोरोनाचा कहर मात्र सुरूच आहे. मंगळवारी क्रीडाग्राममध्ये विदेशी खेळाडू, स्वयंसेवकासह नऊ जण कोरोनाबाधित आढळले. जपान टुडेच्या वृत्तानुसार विदेशी खेळाडू क्रीडाग्रामध्ये तर अन्य आठजण बाहेरचे असून सर्वजण ऑलिम्पिकच्या तयारीशी संबंधित आहेत.