सुहास मांजरेची 'सुवर्ण'धाव

By admin | Published: September 19, 2016 06:45 PM2016-09-19T18:45:30+5:302016-09-19T18:45:30+5:30

पोलीस कॉन्स्टेबल सुहास सोपान मांजरे याने ४ बाय १00 मीटर रिले स्पर्धेत जोरदार धाव घेत महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले.

Suhas Manjrechi's 'gold' | सुहास मांजरेची 'सुवर्ण'धाव

सुहास मांजरेची 'सुवर्ण'धाव

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १९ : पोलीस कॉन्स्टेबल सुहास सोपान मांजरे याने ४ बाय १00 मीटर रिले स्पर्धेत जोरदार धाव घेत महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्या वतीने ६५ व्या अखिल भारतीय पोलीस अँथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर धावण्याच्या ८00 मीटर स्पर्धेत सोनी मोकळने सुवर्ण पदकावर नाव कोरले.
मुंबईचे सहपोलिस आयुक्त अनुपकूमार सिंग यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन करण्यात आले. सिंग यांनी खेळाडूंना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियामक मंडळाच्या मान्यतेने हैद्रराबाद येथील जीएमसी बालायोगी, गचिबावली स्टेडियमवर स्पर्धा पार पडली. स्पर्धेत निमलष्करी बल आणि राज्य पोलीस अशा ४0 संघाच्या १ हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. 

रिले स्पर्धेत महाराष्ट्र संघात सुहाससह विपीन धावले (सातारा), राहूल काळे (सिंधूदुर्ग), विजय जाधव (कोल्हापूर) यांचा समावेश होता. त्याचबरोबर वैयक्तिक ८00 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सोनी मोकळने सुवर्ण पदक मिळवले. साईगीताने ५000 मीटर स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरले. तर स्वाती भिलारेने ४ बाय ४00 मी. रिले स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली.
सुहासच्या 'सुवर्ण' कमाईची मुंबई पोलिस दलाने तात्काळ दखल घेत त्याला पोलिस नाईक पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. सुहास प्रशिक्षक विजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. २00९ सालापासून विविध क्रीडा स्पर्धेत सुहास पोलीस दलाचे विजयी प्रतिनिधीत्व करत आहे.

Web Title: Suhas Manjrechi's 'gold'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.