Sunil Chhetri : जय हो ! भारताने 8 व्यांदा सैफ चॅम्पियन ट्रॉफी जिंकली, छेत्रीनं केली मेस्सीची बरोबरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 23:57 IST2021-10-16T23:55:34+5:302021-10-16T23:57:14+5:30
Sunil Chhetri : पहिल्या हाफमध्ये फुटबॉलवर भारतीय संघाचेच नियंत्रण दिसून आले. पण, टीम इंडियाला गोल करता आला नाही. छेत्रीने दुसऱ्या हाफमध्ये काही मनिटांतच गोल केला.

Sunil Chhetri : जय हो ! भारताने 8 व्यांदा सैफ चॅम्पियन ट्रॉफी जिंकली, छेत्रीनं केली मेस्सीची बरोबरी
भारतीय फुटबॉल संघाने नेपाळला 3-0 ने पराभूत करत आठव्यांदात सेफ चॅम्पियन होण्याच्या बहुमान मिळवला आहे. विशेष म्हणजे कर्णधार सुनिल छेत्रीने (Sunil Chhetri )49 व्या मिनिटाला गोल करुन लियोनेल मेस्सीच्या 80 गोलची बरोबरी केली आहे. भारताकडून दुसऱ्या हाफमध्ये सुरेशसिंह आणि सहल अब्दुल समाद यांनी गोले केले होते. सुरेशने 50 व्या तर समादने 90 व्या मिनिटांनी गोल केले होते.
पहिल्या हाफमध्ये फुटबॉलवर भारतीय संघाचेच नियंत्रण दिसून आले. पण, टीम इंडियाला गोल करता आला नाही. छेत्रीने दुसऱ्या हाफमध्ये काही मनिटांतच गोल केला. त्यानंतर, दुसऱ्या मिनिटालाच सुरेशने आणखी एक गोल केल्यामुळे भारताचे 2 गोल झाले. मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमक यांच्यासमवेतचा भारताने जिंकलेला हा पहिलात खिताब आहे. जरी पिसेक आणि स्टीफन कोन्स्टेटाईन यांच्यानंतरचे हे तिसरे विदेशी कोच आहेत. ज्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने हा खिताब जिंकला आहे.
Champions!! 🚨🚨@IndianFootball march to a record-extending 8th #SAFFChampionship title after beating #Nepal 3-0 in the final. 💥💥
— Khel Now (@KhelNow) October 16, 2021
🇮🇳 3-0 🇳🇵 pic.twitter.com/yYIi76FRGB
छेत्रीने उजव्या फ्लँकने प्रीमत कोटालकडून मिळालेल्या चेंडूवर गोल करून भारताला बढत मिळवून दिली. त्यानंतर, दुसऱ्याच मिनिटाला भारताने आक्रमण करून नेपाळच्या बचावात्मक खेळाला नेस्तनाबूत केले. तर, भारतासाठी तिसरा गोल 90 व्या मिनिटाला समादने केला.