सुनील नारायणची लक्षवेधी खेळी, रैना सरस

By admin | Published: April 22, 2017 01:32 AM2017-04-22T01:32:43+5:302017-04-22T04:48:43+5:30

रैनाच्या ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरात लायन्सने अखेरीस विजय मिळवला. मात्र या सामन्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती सुनील नारायणची ४२ धावांची तुफानी खेळी.

Sunil Narine's extraordinary knock, Raina mustard | सुनील नारायणची लक्षवेधी खेळी, रैना सरस

सुनील नारायणची लक्षवेधी खेळी, रैना सरस

Next

- आकाश नेवे/ऑनलाइन लोकमत

रैनाच्या ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरात लायन्सने अखेरीस विजय मिळवला. मात्र या सामन्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती सुनील नारायणची ४२ धावांची तुफानी खेळी. सुनील नारायणला सलामीला पाठवण्याचा केकेआरचा निर्र्णय दुसऱ्यांदा यशस्वी ठरला. या आधीही तो किंग्ज इलेव्हन विरोधात खेळताना सुनीलने सलामीला येऊन १८ चेंडूत ३७ धावा काढल्या होत्या.
वेस्ट इंडिज्च्या सुनील नारायणकडे केकेआरने आतापर्यंत फक्त फिरकीपटू म्हणून पाहिले होते. त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर केकेआरला आतापर्यंत अनेक सामने जिंकून दिले आहे. मात्र या आयपीएलमध्ये केकेआरने नव्याने प्रयोग सुरू केला. तो म्हणजे पार्ट-टाईम ओपनर पाठवण्याचा. आधी ख्रीस लीन आणि आता सुनील नारायण हे या प्रयोगातले शिलेदार ठरले. या सामन्यात सुनीलच्या तुफानी खेळीने केकेआरला एक उत्तम सुरुवात करून दिली. सुनीलने या सामन्यात २४७ च्या स्ट्राईकरेटने धावा काढल्या. या खेळीत त्याने एक अनोखा विक्रम केला. ९ चौकार आणि एक षटकार ठोकत ४२ धावा केल्या. त्याच्या या खेळीत त्याने एकेरी किंवा दुहेरी धावा काढल्याच नाही. अशीच खेळी २००८ मध्ये डेक्कन चार्जसकडून सनथ जयसूर्या याने केली होती. जयसूर्याने त्या वेळी ३६ धावा काढल्या होत्या.


ब्रेंडन मॅकक्युलम याने ३३ धावा केल्या. याच जोरावर त्याने आॅरेंज कॅपच्या शर्यतीत मुंबईचा स्टार नितीश राणाला मागे टाकले. मॅकक्युलमने आतापर्यंत आयपीएल १० मध्ये २५८ धावा केल्या आहेत.
पर्पल कॅप सध्या सनरायजर्स हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारकडेच आहे. त्याने सहा सामन्यात १५ गडी बाद केले आहेत.

 

Web Title: Sunil Narine's extraordinary knock, Raina mustard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.