सनरायझर्स विजयाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: April 30, 2016 05:44 AM2016-04-30T05:44:19+5:302016-04-30T05:44:19+5:30
सनरायझर्स हैदराबाद संघ उद्या, शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर मात करीत विजयी वाटेवर परतण्याच्या प्रतीक्षेत आहे.
हैदराबाद : पुणे संघाकडून झालेल्या पराभवातून धडा घेत सनरायझर्स हैदराबाद संघ उद्या, शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर मात करीत विजयी वाटेवर परतण्याच्या प्रतीक्षेत आहे.
याआधी उभय संघात झालेला सामना आरसीबीने जिंकला होता. त्यानंतर सनरायझर्सने कामगिरीत सुधारणा करीत सहापैकी तीन सामने जिंकले. या संघाचे सहा गुण आहेत. मागच्या सामन्यात पुण्याकडून डकवर्थ-लुईस नियमानुसार पराभूत झाल्याने सनरायझर्सची विजयी घोडदौड थांबली होती. शिखर धवन वगळता अन्य कुणीही फलंदाज धावा काढू न शकल्याने ११८ धावात संघ बाद झाला. डेव्हिड वॉर्नर खाते उघडू शकला नव्हता. अन्य फलंदाज देखील अपयशी ठरले. या चुकांपासून बोध घेत संघाला विजय मिळविण्याचे आव्हान असेल. सनरायझर्सकडे केन विलियम्सन व ट्रेंट बोल्ट हे दिग्गज फलंदाज आहेत; पण त्यांना अद्याप संधी मिळालेली नाही. संघाला बळकटी प्रदान करण्यासाठी या दोघांना संधी मिळू शकते. यजमानांकडे आशिष नेहरा, भूवनेश्वरकुमार, मुस्तफिझूर रहमान, बिपुल शर्मा आणि मोझेस हेन्रिक्स हे गोलंदाज आहेत.
दुसरीकडे लय मिळविण्यासाठी झुंज देत असलेल्या आरसीबीचे पाच सामन्यांत चारच गुण आहेत. ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत फलंदाजी कमकुवत बनली; पण विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स हे शानदार फॉर्ममध्ये आहेत. शेन वॉटसनने फलंदाजी व गोलंदाजीत चमक दाखविली. युवा सर्फराज खान यानेही योगदान दिले; पण या संघाची चिंता गोलंदाजी आहे. दिल्ली आणि मुंबई विरुद्ध गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या. (वृत्तसंस्था)
>उभय संघ यातून निवडणार
सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), आशिष रेड्डी, रिकी भुई, विपुल शर्मा, ट्रेंट बोल्ट, बेन कटिंग, शिखर धवन, मोझेस हेन्रिक्स, दीपक हुडा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, अभिमन्यू मिथुन, इयान मॉर्गन, मुस्तफिजूर रहमान, आशिष नेहरा, नमन ओझा, विजय शंकर, कर्ण शर्मा, बरिंदर सरन, टी. सुमन, आदित्य तारे, केन विल्यम्सन आणि युवराज सिंग.
रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर : विराट कोहली (कर्णधार), वरुण अॅरॉन, अबू नेचीम, एस. अरविंद, सॅम्युअल बद्री, स्टुअर्ट बिन्नी, यजुवेंद्र चहल, एबी डीव्हिलियर्स, प्रवीण दुबे, ख्रिस गेल, ट्रॅव्हिस हेड, इक्बाल अब्दुल्ला, केदार जाधव, अक्षय कर्णेवार, सर्फराज खान, विक्रमजित मलिक, मनदीपसिंग, अॅडम मिल्ने, हर्षल पटेल, लोकेश राहुल, परवेझ रसूल, केन रिचर्डसन, सचिन बेबी, मिशेल स्टार्क, विकास टोकस, शेन वॉटसन, डेव्हिड वीस, तबरेज शम्सी.