सनरायझर्सचे दिल्लीपुढे कठीण आव्हान
By admin | Published: May 12, 2016 02:56 AM2016-05-12T02:56:25+5:302016-05-12T02:56:25+5:30
लग दोन पराभवानंतर विजयी रुळावर येण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला आयपीएल-९ मध्ये आज गुरुवारी सनरायझर्स हैदराबादच्या अवघड आव्हानास सामोरे जावे लागेल.
हैदराबाद : सलग दोन पराभवानंतर विजयी रुळावर येण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला आयपीएल-९ मध्ये आज गुरुवारी सनरायझर्स हैदराबादच्या अवघड आव्हानास सामोरे जावे लागेल.
सनरायझर्स शानदार फॉर्ममध्ये असून, त्यांच्या फलंदाजांनी; तसेच गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने एक नव्हे, तर दोनवेळा एकट्याच्या बळावर विजय मिळवून दिले आहेत. सलामीच्या शिखर धवन याने काल पुण्याविरुद्ध २७ चेंडूंत ३३ धावा ठोकल्या होत्या. हैदराबादने हा सामना चार धावांनी जिंकला, ज्यात अॅडम झम्पा याने १९ धावांत सहा गडी बाद केले होते. या संघाकडे केन विलियम्स, मोझेस हेन्रिक्स, दीपक हुड्डा हे फलंदाज; तसेच भुवनेश्वर, आशिष नेहरा, मुस्तफिझूर रहमान आणि बरिंदर सरन हे गोलंदाज आहेत.
दिल्ली नऊ सामन्यांत दहा गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात खेळत असलेल्या या संघाच्या फलंदाजीची भिस्त क्विंटन डिकॉक, गोलंदाजीत झहीर खान, यष्टिरक्षणात संजू सॅमसन, आघाडीच्या फळीत करण नायर असे चांगले खेळाडू आहेत. युवा सॅमसन आणि ऋषभ पंत यांच्यावर मधल्या फळीत धावा खेचण्याची जबाबदारी असेल. दिल्लीने काही सामन्यादम्यान दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली होती. आज या खेळाडूंचे पुनरागमन होते का, हे पाहणे रंजक ठरेल.(वृत्तसंस्था)
> उभय संघ यातून निवडणार
दिल्ली डेअरडेव्हिल्स : झहीर खान (कर्णधार), ख्रिस मॉरिस, महंमद शमी, नॅथन कुल्टर-नाईल, संजू सॅमसन, कार्लोस ब्रेथवेट, करुण नायर, अमित मिश्रा, क्विंटन डिकॉक, श्रेयस अय्यर, जेपी ट्युमिनी, ऋषभ पंत, मयंक अगरवाल, इम्रान ताहीर, शाहबाज नदीम, सौरभ तिवारी, एल्बी मॉर्केल, जयंत यादव, पवन नेगी, खलील अहमद, सॅम बिलिंग्ज, ख्रिस मॉरिस, चमा मिलिंद, अखिल हरवदकर, महीपाल लोमरोर, जोएल पॅरिस व पवन सुयाल.
सनरायझर्स हैदराबाद : शिखर धवन (कर्णधार), युवराजसिंग, आशिष नेहरा, डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वरकुमार, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, इआॅन मॉर्गन, मुस्तफिझूर रहमान, आदित्य तरे, बरिंदर सरन, के. एल. राहुल, मोझेस हेन्रिक्स, परवेझ रसूल, केन विल्यमसन, नमन ओझा, अभिमन्यू मिथुन, आशिष रेड्डी, विपुल शर्मा, सिद्धार्थ कौल, रिकी भुई,
बेन कटिंग, विनय शंकर, आशिष नेहरा व टी. सुमन