सनरायजर्स-किंग्ज इलेव्हन आमनेसामने
By admin | Published: April 23, 2016 04:16 AM2016-04-23T04:16:48+5:302016-04-23T04:16:48+5:30
सलग दोन विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार
हैदराबाद : सलग दोन विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हनविरुद्ध विजय मिळवण्यास हैदराबाद संघ उत्सुक आहे.
सलग दोन सामने गमावल्यानंतर हैदराबाद संघाने दमदार पुनरागम करीत गेल्या दोन लढतींमध्ये मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून तर गुजरात लायन्सचा गुरुवारी १० गडी राखून पराभव केला. युवराज सिंग, आशिष नेहरा व केन विलियम्सन यांच्यासारखे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असले तरी हैदराबादने गेल्या दोन लढतींत विजयाला गवसणी घातली.
दुसरीकडे पंजाबने चार सामन्यांतून केवळ दोन गुण मिळवले असून गुणतालिकेत तळाला आहे. पंजाबच्या फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.
> प्रतिस्पर्धी संघ
सनरायझर्स हैदराबाद डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), आशिष रेड्डी, रिकी भुई, विपुल शर्मा, ट्रेंट बोल्ट, बेन कटिंग, शिखर धवन, मोइजेस हेन्रिक्स, दीपक हुड्डा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, अभिमन्यू मिथुन, इयोन मॉर्गन, मुस्तफीजूर रहमान, आशिष नेहरा, नमन ओझा, विजय शंकर, कर्ण शर्मा, बरिंदर सरण, टी सुमन, आदित्य तारे, केन विलियम्सन आणि युवराज सिंग.
किंग्ज इलेवन पंजाब डेविड मिलर (कर्णधार), केली एबोट, मुरली विजय, मनन व्होरा, मिशेल जॉन्सन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, अनुरीत सिंग, अक्षर पटेल, रिद्धिमान साहा, प्रदीप साहू, संदीप शर्मा, मोहित शर्मा, मार्कस स्टोइनिस, स्वप्नील सिंग, अरमान जाफर, फरहमान बेहरदीन, केसी करियप्पा, ऋषी धवन, गुरकीरत सिंग मान, निखिल नाईक आणि शार्दूल ठाकूर.