सनरायझर्सची विजयाची हॅट्ट्रिक

By admin | Published: April 24, 2016 04:08 AM2016-04-24T04:08:10+5:302016-04-24T05:43:10+5:30

मुस्तफिजूर रहमानच्या धारदार गोलंदाजीनंतर जबरदस्त सूर गवसलेल्या कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे आयपीएल ९ मधील चौथे अर्धशतक या बळावर सनराझजर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर

Sunrisers' Victory hat-tricks | सनरायझर्सची विजयाची हॅट्ट्रिक

सनरायझर्सची विजयाची हॅट्ट्रिक

Next

हैदराबाद : मुस्तफिजूर रहमानच्या धारदार गोलंदाजीनंतर जबरदस्त सूर गवसलेल्या कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे आयपीएल ९ मधील चौथे अर्धशतक या बळावर सनराझजर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज येथे किंग्ज इलेव्हन पंजाबचा ५ गडी राखून पराभव करीत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.
वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर आणि मोइजेज हेनरिक्स यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर सनरायझर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला ६ बाद १४३ धावसंख्येवर रोखले. त्यानंतर वॉर्नर (५९) आणि शिखर धवन (४५) यांनी सलामीसाठी केलेल्या ९० धावांच्या भागीदारीच्या बळावर १७.५ षटकांत ५ गडी गमावून १४६ धावा करीत सलग तिसरा विजय मिळवला.
वॉर्नरने ३१ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार, ३ षटकार मारले, तर शिखर धवनने ४४ चेंडूंत ४ चौकार मारले. पंजाबकडून शॉन मार्शने सर्वाधिक ४० धावा केल्या. अक्षर पटेलने १७ चेंडूंतच १ चौकार, ३ षटकारांसह नाबाद ३६ धावांची खेळी केली. याशिवाय निखिल नाईक (२२) याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी करीत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ६ बाद १४३, मनन व्होरा २५, शॉन मार्श ४०, निखिल नाईक २२, अक्षर पटेल नाबाद ३६, हेनरिक्स २/३२, मुस्तफिजूर २/९)
सनरायझर्स हैदराबाद : १७.५ षटकांत ५ बाद १४६. (वॉर्नर ५९, शिखर धवन ४५, इयॉन मॉर्गन २५. मोहित शर्मा १/२0)

Web Title: Sunrisers' Victory hat-tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.