सुपर मॉम; बॉक्सर ते आई मेरी कोम निभावते दुहेरी भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 03:54 AM2018-08-02T03:54:51+5:302018-08-02T03:55:29+5:30
मेरी कोम हिची तुलना सध्या जगप्रसिद्ध बॉक्सर मॅनी पॅकियायो याच्यासोबत होत आहे. पॅकियायो हा फिलिपिन्सचा सिनेटर आहे, तर मेरी कोम सध्या राज्यसभेची सदस्य आहे. या दोघांच्याही आयुष्यात दुहेरी भूमिका आहेत.
नवी दिल्ली : मेरी कोम हिची तुलना सध्या जगप्रसिद्ध बॉक्सर मॅनी पॅकियायो याच्यासोबत होत आहे. पॅकियायो हा फिलिपिन्सचा सिनेटर आहे, तर मेरी कोम सध्या राज्यसभेची सदस्य आहे. या दोघांच्याही आयुष्यात दुहेरी भूमिका आहेत. त्यात दोघेही व्यस्त असले. तरी मेरी कोम आई म्हणूनही सजग आहे. आणि ती पुरेसा वेळ आपल्या मुलांसोबत घालवते.
२०१६ मध्ये मेरी कोम हिला राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यात आले. त्यानंतर तिने पाचवे आशियाई पदक जिंकले. तसेच २०१२ च्या आॅलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक मिळवले होते. आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी ती पहिली महिला भारतीय खेळाडू आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मॅग्निफिशंट मेरी म्हणून तिला ओळखले जाते. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनने तिला गौरवले होते.
राष्ट्रकुल स्पर्धेतील लढत तिच्यासाठी स्मरणीय राहिली. या लढतीत तिने ४८ किलो गटात आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहाराचा पराभव केला होता.
मेरी कोम हिचे बॉक्सिंग करियर हे प्रभावी राहिले आहे. ती भारतातील सर्वात यशस्वी महिला खेळाडू ठरली आहे. आता राज्यसभा सदस्य म्हणूनही ती आपली जबाबदारी निभावत आहे.
आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावण्यातही सुपर मॉम मेरी आघाडीवर आहे. ३५ व्या वर्षीही निवृत्तीचा विचार तिच्या मनाला शिवलेला नाही.
मेरीने २००३ मध्ये अर्जुन पुरस्कार, २००६ मध्ये पद्मश्री आणि २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळवला आहे. पद्मभूषण पुरस्कार मिळवणारी मेरी ही पहिली हौशी खेळाडू आहे.
सुपर मॉम मेरी
नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी आपल्या मुलांसोबत वेळ घालवणे तिला आवडते. तिन्ही मुलांसोबत तिला फुटबॉल खेळायला आवडते. मेरी कोम तिची मुले कोरोंग रेचुंगवर, कोरोंग खुपनुईवर, कोम आणि सर्वात धाकटा कोरोंग प्रिन्स चुंगथांगलेन यांच्यासोबत पुरेसा वेळ घालवते.