केरिगनच्या पुनरागमनाला पाठिंबा

By admin | Published: July 17, 2014 12:49 AM2014-07-17T00:49:07+5:302014-07-17T00:49:07+5:30

सायमन केरिगन याच्या इंग्लंड संघातील पुनरागमनावर होत असलेल्या टीकेनंतर संघसहकाऱ्यांनी मात्र त्याला पाठिंबा दर्शविला आहे

Support for Kyrgyz's reboot | केरिगनच्या पुनरागमनाला पाठिंबा

केरिगनच्या पुनरागमनाला पाठिंबा

Next

लंडन : सायमन केरिगन याच्या इंग्लंड संघातील पुनरागमनावर होत असलेल्या टीकेनंतर संघसहकाऱ्यांनी मात्र त्याला पाठिंबा दर्शविला आहे. या फिरकीपटूला भारताविरुद्ध सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा संधी दिली, तर तो आपल्या खेळात सुधारणा करेल, असा विश्वास संघसहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात केरिगनला संघात स्थान देण्यात आले होते. मात्र, त्याने या संधीचा फायदा उठविला नाही.
कामगिरीत तो कमी
पडला. पहिल्या डावात त्याने ८ षटकांत ५३ धावा दिल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याला कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने गोलंदाजीसाठी उतरविले नव्हते.
इंग्लंडचा सलामीवीर सॅम रॉबसनने केरिगनचे समर्थन केले आहे. दुसऱ्यांदा त्याला संधी दिली गेली तर तो स्वत:ला सिद्ध करेल, असा विश्वास रॉबसनने व्यक्त केला आहे.‘तो दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज आहे,’ असे माजी कर्णधार मायकल वॉनने म्हटले आहे.
इंग्लंडचे माजी फिरकी गोलंदाज फिल टफनेल म्हणाले, की केरिगनसाठी सध्या खराब वेळ आहे. त्याचा त्याच्यावर काय परिणाम होईल, हे सांगू शकत नाही.

Web Title: Support for Kyrgyz's reboot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.