सुरेश रैना @5000
By admin | Published: November 3, 2014 02:27 AM2014-11-03T02:27:33+5:302014-11-03T02:27:33+5:30
श्रीलंकेविरुद्ध रविवारी खेळल्या गेलेल्या वन-डे लढतीत अर्धशतकी खेळी करताना सुरेश रैनाने वन-डे क्रिकेट कारकीर्दीत पाच हजार धावांचा पल्ला गाठला
कटक : श्रीलंकेविरुद्ध रविवारी खेळल्या गेलेल्या वन-डे लढतीत अर्धशतकी खेळी करताना सुरेश रैनाने वन-डे क्रिकेट कारकीर्दीत पाच हजार धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा तो ११वा भारतीय फलंदाज ठरला आहे. कारकीर्दीतील २०० वा वन-डे सामना खेळणाऱ्या रैनाला १७२व्या डावात पाच हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी ४४ धावांची गरज होती. पाच हजार धावा पल्ला गाठण्यासाठी त्याला सर्वाधिक डाव खेळावे लागले. सर्वांत कमी डावांमध्ये पाच हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या (११४ डाव) नावावर आहे. आज रैनाने हा विक्रम नोंदविला त्यावेळी विराट दुसऱ्या टोकावर फलंदाजी करीत होता. भारतातर्फे वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (१८४२६) नावावर आहे. रैना यापूर्वी २०० वन-डे सामने खेळणारा १२वा भारतीय फलंदाज ठरला. तेंडुलकरने सर्वाधिक (४६३) वन-डे सामने खेळलेले आहेत. (वृत्तसंस्था)