भारत - पाकिस्तान सामन्यात सचिन चाहत्यांना देणार सरप्राईज

By admin | Published: June 3, 2017 11:20 AM2017-06-03T11:20:06+5:302017-06-03T11:53:04+5:30

चॅम्पिअन्स ट्रॉफीत भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यान सचिन तेंडुलकरची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे

Surprising to give Sachin Tendulkar fans in India-Pakistan match | भारत - पाकिस्तान सामन्यात सचिन चाहत्यांना देणार सरप्राईज

भारत - पाकिस्तान सामन्यात सचिन चाहत्यांना देणार सरप्राईज

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - भारतीयांसाठी क्रिकेट विश्वातील देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना भेटत आहे. सचिनचा आयुष्यपट पाहण्यासाठी चाहतेही मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सचिनने निवृत्ती घेतल्यापासून त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान सध्या सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष 4 जूनकडे आहे. कारण यादिवशी क्रिकेट विश्वातील पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानदरम्यान सामना होणार आहे. सचिनच्या चाहत्यांसाठी तर हा डबल धमाका असणार आहे. कारण चॅम्पिअन्स ट्रॉफीत भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यान सचिन तेंडुलकरची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे
 
पण सचिन तेंडुलकरची ही फटकेबाजी मैदानात नसून मैदानाबाहेर असणार आहे. सचिन या सामन्यात कॉमेंट्री करणार असल्याचं कळत आहे. आतापर्यंत मैदानावर आपल्या तुफान फटकेबाजीने गोलंदाजांची झोप उडवणारा सचिन आपल्याला यानिमित्ताने नवीन अवतारात पाहायला मिळेल. कॉमेंट्रीच्या या क्षेत्रात सचिन तेंडुलकरचं हे पदार्पण असेल. रविवारी खेळण्यात येणा-या या सामन्यात सचिन स्टार स्पोर्ट्सच्या पॅनलचा एक भाग असेल. 
 
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार सचिन तेंडूलकरने या खास सामन्यासाठी स्टार स्पोर्ट्ससोबत करार केला आहे. सचिनने कॉमेंट्री करणं त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सरप्राईजपेक्षा कमी नसणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन तेंडुलकर स्टार स्पोर्ट्सच्या हिंदी कॉमेंट्रीचा भाग असणार आहे. 
 
हिंदी कॉमेंट्री करत पदार्पण करणा-या सचिन तेंडुलकरला यावेळी अनेक दिग्गजांची साथ लाभणार आहे. या टीममध्ये त्याच्यासोबत सुनील गावस्कर, सौरभ गांगुली आणि विरेंद्र सेहवाग सोबतीला असतील. याशिवाय सबा करीम आधीच इंग्लंडला पोहोचले आहेत. तसंच काही पाकिस्तानी कॉमेंटेटरदेखील स्टार स्पोर्ट्सच्या हिंदी कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतील. 
 
स्टारच्या अधिका-यांनी मात्र यावर काहीही अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन कॉमेंट्री करणार हे नक्की आहे. यासंदर्भात सचिन तेंडूलकरनेही काही भाष्य केलेलं नाही. सचिनही इंग्लंडसाठी रवाना झाला आहे. 
 

Web Title: Surprising to give Sachin Tendulkar fans in India-Pakistan match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.