जगज्जेत्याला झुंजविलं, आता जिंकण्यासाठीच खेळणार- सरदारसिंग

By admin | Published: June 22, 2016 08:33 PM2016-06-22T20:33:00+5:302016-06-22T20:33:00+5:30

जगज्जेता असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला झुंजविल्याने खेळाडूंचा आत्मविश्वसा प्रचंड वाढला आहे

Surrounded by the world, it will play for the win - Sardar Singh | जगज्जेत्याला झुंजविलं, आता जिंकण्यासाठीच खेळणार- सरदारसिंग

जगज्जेत्याला झुंजविलं, आता जिंकण्यासाठीच खेळणार- सरदारसिंग

Next

शिवाजी गोरे

पुणे, दि. 22 - जगज्जेता असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला झुंजविल्याने खेळाडूंचा आत्मविश्वसा प्रचंड वाढला आहे. आता प्रत्येक सामना हा जिंकण्यासाठीच खेळणार आहे. आॅलिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसाठी संपूर्ण संघ आतुर असल्याचा विश्वास भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग याने व्यक्त केला.
बंगळुरू येथील साई सेंटर येथे सध्या भारतीय हॉकी संघाचा सराव सुरू आहे. यामध्ये सहभागी असलेल्या सरदार सिंग याने लोकमतशी संवाद साधला. सरदार म्हणाला,  मार्गदर्शक रोलंट ओल्टमन्स प्रत्येक खेळाडूची जातीने तयारी करून घेत आहेत. युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांच्या मनातील भीती घालविणे. उणिवा व चुकांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करणे याचा त्यामध्ये समावेश आहे. दीड महिन्यावर आॅलिम्पिक स्पर्धा आली आहे. चॅम्पियन्स चषक स्पर्धेत आपल्या संघाने बलाढ्य आॅस्ट्रेलिया संघाला अंतिम सामन्यात गोलशून्य बरोबरीत रोखले. पेनल्टी शूटआऊटमध्ये आपल्याला रौप्यपदक मिळाले, हा एक इतिहासच आहे. भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम फेरीत कधीच प्रवेश केला नव्हता. 
आॅलिम्पिक स्पर्धेत आपल्या गटात असलेल्या इतर संघांची सध्या कामगिरी आणि आपली तयारी याबाबत काय सांगाल?
जगज्जेत्या आॅस्ट्रेलियाला आपल्या संघाने अंतिम लढती शेवटपर्यंत झुंजवले. यावरून तुम्ही अंदाज करू शकता, की आपल्या संघाची तयारी कशी सुरू असेल. प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. ओल्टमन्स यांचे संघाच्या कामगिरी सुधारण्याबाबतचे प्रयोग उपयोगात येत आहेत. त्यांनी संघातील खेळाडूंच्या शैलीत चांगलाच बदल घडवून आणला आहे. कॅनडासारखा संघ आपल्या गटात असला तरी आम्ही त्या संघाला कमी लेखणार नाही. प्रत्येक सामना जिंकण्याच्या दृष्टीने खेळावा लागणार आहे. प्रत्येक संघाविरुद्ध खेळताना आम्हाला एक वेगळे नियोजन करावे लागणार आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने कोणतेही दडपण न घेता मनमोकळेपणाने खेळावे, असे त्यांचे म्हणणे असते. भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध, दुसरा जर्मनी, तिसरा अर्जेंटिना, चौथा नेदरलॅँड आणि पाचवा कॅनडा त्यामुळे आम्ही जे काही गुण संपादन करायचे आहेत, ते पहिल्या चार लढतींमध्ये करावे लगणार आहेत.

संघाच्या प्रशिक्षणात कशावर भर दिला जात आहे?

तंदुरुस्ती (फिटनेस), तंत्र (टेक्निक), चपळता, लाँग व शॉर्ट पासिंग यावर ओल्टमन्स यांचा जास्त भर असतो. आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी एकमेकांमध्ये समन्वय कसा साधायचा, यावर विशेष लक्ष दिले जात आहे. चॅम्पियन्स चषकातील चुका आम्हाला सुधाराव्या लागतील. आपण पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत झालो. व्हिडिओ पंचांनी काहीही निर्णय देऊ द्यात, आम्हाला नक्कीच सुधारणा करावी लागणार आहे. हरमनप्रीत, रघुनाथ, उथप्पा, सुनील, सुरेंद्र, मनप्रीत यांच्या खेळात खूपच सुधारणा झाली आहे. चॅम्पियन्स चषकच्या अंतिम लढतीत श्रीजेशचे गोलरक्षण थक्क करणारे होते. पण तरीही प्रत्येक सामन्याच्या वेळी कोणाचा कसा खेळ होतो, हे महत्त्वाचे असते. ओल्टमन्स खेळाडूंच्या तंदुरुस्तीकडे जास्त लक्ष देतात. कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये, याकडे त्यांचे लक्ष असते. एकूण सराव आणि सध्या संघाची कामगिरी पाहता मी एवढेच सांगू शकतो, की आम्ही या वेळी आमच्या चाहत्यांना नाराज करणार नाही. 

आपल्या ब गटात जर्मनी, अर्जेंटिना, आयर्लंड, नेदरलँड आणि कॅनडा हे संघ आहेत. या वर्षीपासून प्रत्येक गटातील चार संघ क्वार्टर फायनलसाठी पात्र होतील. त्यामुळे आम्हाला आमच्या गटात पहिल्या चार क्रमांकांमध्ये येणे आवश्यक आहे.
ज्याप्रमाणे आपण विरुद्ध संघाच्या उणिवा शोधून रणनीती आखत असतो. त्याचप्रमाणे समोरच्या संघाचे खेळाडू व मार्गदर्शक नियोजन करीत असतात. त्यामुळे आपले खेळाडू आपल्या मार्गदर्शकाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक सामन्यात खेळ त्या वेळी मैदानावर होईल तो महत्त्वाचा.

युवा खेळाडूंना संधीसाठीच मला विश्रांती

पुढील काळात मला सातत्याने सामने खेळायचे आहेत, त्याचबरोबर संघातील युवा खेळाडूंना बलाढ्य संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळावा, यामुळेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मला विश्रांती दिली गेली, असे सरदार सिंगने सांगितले.
 

Web Title: Surrounded by the world, it will play for the win - Sardar Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.