सुर्यकुमारला रिट्विट भोवले

By admin | Published: February 22, 2017 03:53 AM2017-02-22T03:53:51+5:302017-02-22T03:53:51+5:30

नुकताच झालेल्या आंतरराज्य टी२० स्पर्धेत संघातून वगळण्यात आल्यानंतर त्याप्रकरणी ट्विटरवर आलेल्या एका मेसेजवर

Suryakumar has a retweet | सुर्यकुमारला रिट्विट भोवले

सुर्यकुमारला रिट्विट भोवले

Next

मुंबई : नुकताच झालेल्या आंतरराज्य टी२० स्पर्धेत संघातून वगळण्यात आल्यानंतर त्याप्रकरणी ट्विटरवर आलेल्या एका मेसेजवर रिट्विट केल्याप्रकरणी मुंबईचा आक्रमक फलंदाज सुर्यकुमार यादवला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) नोटिस पाठवून याप्रकरणी खुलासा मागितला आहे.
गुणवान खेळाडू असूनही अनेकदा विविध वादांमुळे टीकेला सामोरे जावे लागणारा सुर्यकुमार आता नव्या वादात अडकला आहे. विशेष म्हणजे यामुळे आता, आगामी विजय हजारे आंतरराज्य एकदिवसीय स्पर्धेसाठीही त्याच्या निवडीवर टांगती तलवार आली आहे. सुर्यकुमारने केलेल्या कृत्याचे एमसीएने गांभिर्याने दखल घेतली असून त्याला संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे, याप्रकरणी लेखी स्पष्टीकरणही त्याला द्यावे लागणार आहे. यानंतरच, मुंबईच्या एकदिवसीय संघातील त्याच्या निवडीबाबत अंतिम निर्णय होईल.
नुकताच झालेल्या सय्याद मुश्ताक अली टी२० स्पर्धेतील कर्णधार आदित्य तरेच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघातून सुर्यकुमारला वगळले असल्याचा मेसेज स्तंभलेखक मकरंद वायंगणकर यांनी पोस्ट केला होता. यावर सुर्यकुमारने रिट्विट केले होते. यावरुन एमसीएने त्याला नोटिस पाठवली आहे.
याबात एमसीएचे संयुक्त सचिव उन्मेश खानविलकर यांनी सांगितले की, ‘खेळाडूंना सोशल नेटवर्किंगवर संघनिवडीबाबत अशाप्रकारे चर्चा करण्याची परवानगी नाही. आम्ही त्याला बुधवारी व्यवस्थापकिय बैठकीमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले असून याप्रकरणी २४ तासांमध्ये त्याच्याकडून खुलासा मागितला आहे. सुर्यकुमारची बाजू पुर्ण जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल.’
तसेच, ‘गतवर्षी मुंबई रणजी संघातून उपांत्य सामन्यात जय बिस्ताला बाहेर बसविल्यानंतरही त्याने नाराजी जाहीर केली होती. याविषयी त्याला तोंडी सूचना देऊन बजावले होते. सुर्यकुमार नक्कीच चांगला खेळाडू आहे. परंतु, शिस्त महत्त्वाची असून एकदिवसीय संघातील त्याची निवड तूर्तास थांबवली आहे,’ असेही खानविलकर म्हणाले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Suryakumar has a retweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.