... हा तर ठाकरे सरकारला जबरदस्त झटका; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 06:46 PM2020-08-19T18:46:58+5:302020-08-20T16:58:03+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कुस्तीपटू अन् भाजपा नेता बबिता फोगाटनं महाराष्ट्र सरकारवर टीका केली.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयानं केल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास पाटणा पोलिसांऐवजी मुंबई पोलिसांकडून करण्यात यावा, अशी याचिका सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं केली होती. त्यावर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल न्यायालयानं आज सुनावला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा आणि मुंबई पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं, असं न्यायालयानं निकालात म्हटलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कुस्तीपटू अन् भाजपा नेता बबिता फोगाटनं महाराष्ट्र सरकारवर टीका केली. तिनं ट्विट केलं की,''सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय प्रशंसनीय आहे.''
सुशांत सिंह मौत मामले में सुप्रीम कोर्ट का फैसला सराहनीय है।#CBITakesOver#CBIforShushant
— Babita Phogat (@BabitaPhogat) August 19, 2020
ती पुढे म्हणाली,''सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायलयानं दिला. बिहार पोलिसांनी दाखल केलेली FIR योग्य असल्याचेही न्यायालयानं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानं महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारला जबदरस्त झटका बसला आहे.''
सुशांत सिंह राजपूत मौत मामले में सुप्रीम कोर्ट द्वारा सीबीआई जांच को सही ठहराया फैसला सुनाते वक्त कोर्ट ने सीबीआई जांच को सही ठहराया है और कहा है कि बिहार पुलिस की FIR सही है।सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद महाराष्ट्र की उद्धव ठाकरे सरकार को जबरदस्त झटका लगा है#SushantSingRajput
— Babita Phogat (@BabitaPhogat) August 19, 2020
अन्य महत्त्वाच्या बातम्या
रांचीमधील मंदिर अन् धोनी...असं आहे श्रद्धेचं नातं; जाणून घ्या सर्वकाही
महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा?
CPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा 'हॅलिकॉप्टर' शॉट मिस करताय; मग रशीद खानचा 'हा' फटका पाहाच
"Dream 11सोबत सौदा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला मोठा धक्का!"
महेंद्रसिंग धोनी 1,250 फुटांवरून झेप घेतो तेव्हा... पाहा थरारक व्हिडीओ
IPL 2020 : होय, Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक, पण...; BCCIनं मांडली बाजू