सुशीलकुमारचे निवृत्तीचे संकेत
By admin | Published: July 8, 2015 01:08 AM2015-07-08T01:08:31+5:302015-07-08T01:08:31+5:30
भारताचा दोन वेळचा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार याने रियो आॅलिम्पिक ही माझी शेवटची स्पर्धा असल्याचे सांगून क्रीडा क्षेत्रातून निवृत्तीचे संकेत दिले आहे.
नवी दिल्ली : भारताचा दोन वेळचा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार याने रियो आॅलिम्पिक ही माझी शेवटची स्पर्धा असल्याचे सांगून क्रीडा क्षेत्रातून निवृत्तीचे संकेत दिले आहे.
पुढील वर्षी रियो दी जानेरियोमध्ये आॅलिम्पिकचा महाकुंभ भरणार आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे सुशिलकुमारने विश्वचषक कुस्तीस्पर्धेतून माघार घेतली होती. सुशिलकुमार हा भारताचा आत्तापर्यंतचा सर्वांत यशस्वी मल्ल आहे. सुशीलकुमार म्हणाला, रियो आॅलिम्पिकमध्ये मी शेवटचा खेळताना दिसेल. मात्र क्रीडा क्षेत्रातून संन्यास घ्यायचा की नाही याबाबत मी आॅलिम्पिक स्पर्धा झाल्यानंतरच निर्णय घेणार आहे. या विषयी माझे गुरु सत्पाल यांच्याशी मी चर्चा केली आहे. त्यांनीही मला स्पर्धेनंतर त्यावर विचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसारच मी पुढील निर्णय घेईल. (वृत्तसंस्था)