फिफा महासचिव वाल्के निलंबित
By admin | Published: September 19, 2015 03:56 AM2015-09-19T03:56:46+5:302015-09-19T03:56:46+5:30
तिकीट घोटाळ्यात सामील असल्यावरून फिफा महासचिव जेरोम वाल्के यांना नाट्यमयरीत्या निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध तपास सुरू झाल्याने आधीच वादात
झुरिच : तिकीट घोटाळ्यात सामील असल्यावरून फिफा महासचिव जेरोम वाल्के यांना नाट्यमयरीत्या निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध तपास सुरू झाल्याने आधीच वादात अडकलेल्या फिफाच्या अडचणींमध्ये वाढ झाली.
निवृत्त फिफा अध्यक्ष सॅप ब्लाटर यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्के यांना ताबडतोब प्रभावाने जबाबदारीमुक्त करण्यात आले. भ्रष्टाचार प्रकरणाच्या तपासाला वेग यावा, यासाठी अटकेत असलेल्या फिफा उपाध्यक्षांना अमेरिकेच्या स्वाधीन करण्यास मात्र स्वित्झर्लंडने नकार दिला. फिफाने एका निवेदनात स्पष्ट केले की, वाल्के यांना ताबडतोब प्रभावाने सर्व जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. ते दीर्घ रजेवर गेले आहेत. फिफाला त्यांच्याविरुद्धच्या आरोपांची माहिती
मिळताच फिफाच्या नैतिक समितीने औपचारिक तपास सुरू केला.
विश्वचषकाच्या तिकीट विक्रीतील घोटाळ्यात सामील असल्याचा वाल्के यांच्यावर आरोप आहे. तिकिटांच्या कमाईचा मोठा वाटा त्यांच्या खात्यात वळता करण्यात आल्याची चर्चा आहे. २०१४ च्या विश्वचषक फुटबॉलच्या तिकिटांची विक्री करणाऱ्या एका कंपनीतील अमेरिकेचे सल्लागार बेली एलिन यांनी घोटाळ्याची चर्चा होताच हा करार नंतर रद्द करण्यात आल्याचा दावा केला आहे. (वृत्तसंस्था)