आयपीएल मीडिया अधिकार निविदा प्रक्रिया स्थगित

By Admin | Published: October 25, 2016 07:53 PM2016-10-25T19:53:23+5:302016-10-25T19:53:23+5:30

सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या रोषाला सामोरे जात असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आणखी एक धक्का बसला आहे.

Suspended IPL Media Rights Tender Process | आयपीएल मीडिया अधिकार निविदा प्रक्रिया स्थगित

आयपीएल मीडिया अधिकार निविदा प्रक्रिया स्थगित

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 25 -  सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या रोषाला सामोरे जात असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आणखी एक धक्का बसला आहे. बीसीसीआयला इंडियन प्रीमिअर लीगची (आयपीएल) मीडिया अधिकार निविदा प्रक्रिया स्थगित करावी लागली. आयपीएल मीडिया अधिकार निविदा प्रक्रिया मंगळवारी संपन्न होणार होती, पण बीसीसीआयने सोमवारी रात्री उशिरा ही प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. निविदा उघडण्याची पुढील तारीख कुठली असेल, याबाबत मात्र बोर्डाने स्पष्ट केले नाही. बीसीसीआयने स्पष्ट केले की,‘सर्वोच्च न्यायालयाने २१ आॅक्टोबर रोजी दिलेल्या आदेशानुसार लोढा समितीला आयपीएल निविदा प्रकियेचे संरक्षक म्हणून नियुक्त केले आहे. बोर्डाची या प्रक्रियेसाठी पूर्णपणे तयारी होती, पण कुठलेही पाऊल उचलण्यापूर्वी समितीच्या निर्देशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लोढा समितीने या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी अद्याप स्वतंत्र लेखा परीक्षकाची नियुक्ती केलेली नाही.’ यासाठी लोढा समितीसोबत सातत्याने संपर्क साधण्यात आला आणि मीडिया अधिकार निविदा प्रक्रियेला उशीर झाला तर व्यावसायिक हित प्रभावित होत असल्याचे निदर्शनास आणून दिले, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. बोर्डाने त्याचसोबत निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या देश-विदेशातील सदस्यांची क्षमा मागितली आणि त्यांना संयम बाळगण्याची विनंती केली. निविदा प्रक्रियेमध्ये १८ जणांनी निविदा सादर केल्या असल्याचे वृत्त आहे.
(वृत्तसंस्था)

Web Title: Suspended IPL Media Rights Tender Process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.