निलंबित शारापोवा आॅलिम्पिक संघात

By admin | Published: May 27, 2016 03:56 AM2016-05-27T03:56:30+5:302016-05-27T03:56:30+5:30

जागतिक टेनिस क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू रशियाची मारिया शारापोवा हिला डोपिंगच्या आरोपात अस्थायीरीत्या निलंबित करण्यात आले आहे. तरीही रशियन टेनिस महासंघाने

Suspended Sharapova Olympic squad | निलंबित शारापोवा आॅलिम्पिक संघात

निलंबित शारापोवा आॅलिम्पिक संघात

Next

मास्को : जागतिक टेनिस क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू रशियाची मारिया शारापोवा हिला डोपिंगच्या आरोपात अस्थायीरीत्या निलंबित करण्यात आले आहे. तरीही रशियन टेनिस महासंघाने रिओ आॅलिम्पिक पथकात तिचा समावेश केला आहे.
रशियाच्या टेनिस महासंघाने महिला एकेरीसाठी ज्या चार महिला खेळाडूंची निवड केली त्यात शारापोवाचे नाव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या संघात तिच्यासह स्वेतलाना कुझनेत्सोवा, अनास्ताशिया पॅवेलिचेनकोवा, आणि डारिया कसात्किना यांचादेखील समावेश करण्यात आला. नियमानुसार आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये सर्वाधिक गुण संपादन करणाऱ्या खेळाडूचा समावेश देशाच्या आॅलम्पिक संघात करण्यात येतो. शारापोवाच्या खेळण्याविषयी मात्र शंका कायम आहे. १२ मार्चपासून शरापोवावर स्थायी निलंबन लागू झाले आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने तिला मेलडोनियम या ड्रग सेवनात दोषी धरले होते. निलंबनामुळेच शारापोवा सध्या फ्रेंच ओपनबाहेर आहे. शारापोवाच्या खेळण्याची परवानगी रिओ आयोजन समितीकडून ६ जूनपर्यंत येईल. परवानगी नाकारण्यात आल्यास शारापोवाचे स्थान येकाटेरिना माकसिमोवा ही खेळाडू घेईल.
(वृत्तसंस्था)

Web Title: Suspended Sharapova Olympic squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.