सुवर्णकन्या हिमा दास झाली पोलीस उपअधीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 00:08 IST2021-02-27T00:08:03+5:302021-02-27T00:08:10+5:30
हिमाने सांगितले की, ‘सर्वांना माहित आहे. मी काही वेगळे सांगणार नाही.

सुवर्णकन्या हिमा दास झाली पोलीस उपअधीक्षक
गुवाहाटी : स्टार धावपटू हिमा दासची शुक्रवारी आसाम पोलीसच्या उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली. ‘मी लहानपणी बघितलेले स्वप्न साकार झाले,’ अशी प्रतिक्रिया हिमाने व्यक्त केली. हिमाला नियुक्तीचे पत्र आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिले.
हिमाने सांगितले की, ‘सर्वांना माहित आहे. मी काही वेगळे सांगणार नाही. शालेय जीवनापासून मला पोलीस अधिकारी बनायचे होते. हे माझ्या आईचेही स्वप्न होते. आज मला सर्व खेळामुळे मिळाले. मी राज्यात खेळाचा दर्जा सुधारण्याचे काम करेन. आसामला हरयाणाप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम राज्य बनवण्याचा प्रयत्न मी करेन.’