स्वरुप पुराणिक अमेरिकेत ठरले आयर्न मॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 06:35 PM2019-05-27T18:35:26+5:302019-05-27T18:36:41+5:30
मुंबई : इच्छा तेथे मार्ग असे म्हटले जाते आणि ते खरंच आहे. हे डॉ. स्वरुप पुराणिक यांच्या बाबतीत अगदी ...
मुंबई: इच्छा तेथे मार्ग असे म्हटले जाते आणि ते खरंच आहे. हे डॉ. स्वरुप पुराणिक यांच्या बाबतीत अगदी खरे ठरले आहे. तुमच्यातील ताकदीची परीक्षा घेणारी क्रीडा क्षेत्रातील बहुधा सगळ्यात कठीण चाचणी म्हणजेच आयर्न मॅन ट्रायथलॉन पूर्ण करण्याच्या त्यांच्या अद्वितीय महत्त्वाकांक्षेपासून त्यांना कोणीही रोखू शकलेले नाही.
डॉ. स्वरुप (पेरीओडोंटिस्ट आणि आयआयएम पदवीधर) दुहेरी जबाबदारी सांभाळतात. यंदाच्या उन्हाळ्यात 27 एप्रिल रोजी त्यांनी टेक्सास येथे त्यांची दुसरी आयर्न मॅन उत्तर अमेरिकन चॅम्पियनशीप पूर्ण केली. यापूर्वी डॉ. स्वरूप यांनी दुबई येथे फेब्रुवारी 1, 2019 रोजी आयरन मॅन 70.3 चॅम्पियनशिप पूर्ण केली होती. आयर्न मॅन ट्रायथलॉन हा ट्रायथलॉनमधील अत्यंत अवघड प्रकार आहे. यात 4000 मी. खुल्या पाण्यात पोहणे 180 किमी सायकलिंग 42 किमी रन असते. हे सगळे न थांबता याच क्रमाने करायचे असते. ही स्पर्धा पूर्ण करण्यास 16 तासांचा वेळ दिला जातो. जगभरातील हा एक सर्वात कठीण आणि दमवणारा एक दिवसीय क्रीडाप्रकार मानला जातो.
डॉ स्वरूप किती वेळात गेम पूर्ण केला ते खालीलप्रमाणे: जलतरण (1:27:36), सायकलिंग (7:09:29) आणि धावणे (07:35:43) परिणामी, डॉ. स्वरुपने ही त्रैथलॉन रेस 16 तास 31 मिनिटे आणि 12 सेकंदात पूर्ण केली.डॉ. स्वरुप यांच्या या यशाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक कोचिंग यासाठी घेतलेले नाही. काम, प्रशिक्षण, व्यायाम... इतकी विविध कामे त्यांच्या हातात असतात हे पाहता अर्थातच ही कामगिरी सोपी नव्हती. डॉ. स्वरुप यांच्यासाठी ताकद हा काही नवा विषय नाही. आजवरच्या आयुष्यात ते नेहमीच कसलेले अॅथलेट आणि खेळाडू राहिले आहेत. अगदी लहानपणापासून ते पोहणे आणि इतर क्रीडाप्रकार खेळताहेत. त्यामुळे, या स्पर्धेसाठी त्यांनी तयारी केली यात काहीच आश्चर्य नाही. खेळातील त्यांचे यश लक्षणीय आहे. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अंडर १७ आणि अंडर १९ तसेच युनिर्व्हसिटी स्पर्धांमध्ये पोहण्यातील त्यांनी अनेक पदके मिळवली आहेत. ते जिल्हास्तरीय आणि विभागीय स्तरावरील टेबल टेनिलपटू होते. ते जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू आणि राज्यस्तरीय कबड्डीपटू होते. ते नॅशनल क्लास बी बुद्धिबळपटू आणि टेनिसपटूही होते.