जलतरण : रुपाली रेपाळे अकादमीच्या विद्यार्थ्यांनी पार केले गेटवे तर धरमतर अंतर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 09:08 PM2018-04-06T21:08:15+5:302018-04-06T21:08:15+5:30
अभिलाष, जान्हवी आणि राम या तिघांनी मिश्र रीले पद्धतीने हे अंतर 9 तास आणि 22 मिनिटांमध्ये पार केले.
मुंबई : रुपाली रेपाळे जलतरण अकादमीच्या विद्यार्थ्यांनी आज गेटवे ऑफ इंडिया ते धरमतर हे अंतर पार केले. गेटवे ऑफ इंडिया ते धरमतर हे अंतर 38 किलोमीटर एवढे आहे. या अकादमीतील अभिलाष, जान्हवी आणि राम या तिघांनी मिश्र रीले पद्धतीने हे अंतर 9 तास आणि 22 मिनिटांमध्ये पार केले. हे अंतर पार करण्यासाठी दुपारी 12.47 वाजता सुरुवात केली आणि पहाटे 3.25 वाजता त्यांनी हे अंतर पार केले.
रुपाली यांनी वयाच्या 12व्या वर्षी हे अंतर पार करण्याचा विक्रम केला होता. हे अंतर पार करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभिलाष, जान्हवी आणि राम यांनी सहजपणे हे अंतर पार केले. हे प्रयत्न करताना या मुलांच्या प्रशिक्षकांसह त्यांच्या पालकांचा उत्साहदेखाली चांगला होता. अथक मेहनत, समर्पण आणि जिद्द ही त्यांच्या या यशामागची त्रिसूत्री आहे. हे अंतर पार करणारा अभिलाष हा फक्त 13 वर्षांचा आहे, तर जान्हवीचे वय 17 वर्षे आहे. त्यांच्याबरोबर अनुभवी असलेल्या रामचे वय 26 वर्षे आहे. स्पोट्रा कौन्सिल ऑफ पलावा यांनी अभिलाषला रायझिंग स्टार या उपक्रमासाठी निवडलेले आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर देशाचे नाव उंचवावे, असा स्पोट्रा कौन्सिल ऑफ पलावा यांचा मानस आहे.