आज ठरणार टी-२० चॅँम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2016 03:52 AM2016-04-03T03:52:47+5:302016-04-03T03:52:47+5:30

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दोन माजी विजेते संघ आज आपल्या दुसऱ्या जेतेपदासाठी समोरासमोर उभे ठाकणार आहेत. इंग्लंडने २०१०मध्ये, तर वेस्ट इंडिजने २०१२मध्ये टी-२० विश्वचषकावर

T-20 champions today will decide | आज ठरणार टी-२० चॅँम्पियन

आज ठरणार टी-२० चॅँम्पियन

Next

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दोन माजी विजेते संघ आज आपल्या दुसऱ्या जेतेपदासाठी समोरासमोर उभे ठाकणार आहेत. इंग्लंडने २०१०मध्ये, तर वेस्ट इंडिजने २०१२मध्ये टी-२० विश्वचषकावर नाव कोरले आहे. दोन्ही संघ दुसऱ्या किताबासाठी सज्ज झाले आहेत. तुफानी फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या क्रिकेट प्रकारात दोन्ही संघ ‘सुपर टेन ओव्हर’मध्ये तगडे आहेत. या पार्श्वभूमीवर, आकडे काय बोलतात हे पाहू या.

वेस्ट इंडिजने या स्पर्धेतील ५ सामन्यांत धावांचा पाठलाग करून ४ सामन्यांत विजय मिळविला. अफगाणिस्तानविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३पैकी २ सामन्यांत विजय मिळविला, तर २ सामन्यांत धावांचा पाठलाग करून विजयावर शिक्कामोर्तब केले.

असे आहे बलाबल

9-4
अशी वेस्ट इंडिजची इंग्लंडविरुद्ध टी-२० क्रिकेटमधील कामगिरी आहे. वेस्ट इंडिजने
९ सामन्यांत विजय मिळविला असून,
४ सामन्यांत पराभव स्वीकारला आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत ४ वेळा दोन्ही संघ समोरासमोर आले असून, या चारही सामन्यांत विंडिज विजयी ठरला आहे.

9.12
सरासरीने प्रत्येक षटकामागे धावा फटकावणारा इंग्लंड एकमेव संघ. पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेने ८.७८च्या सरासरीने धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिज ७.७८च्या सरासरीने पाचव्या स्थानी आहे.

36
षटकार फटकावून वेस्ट इंडिज अव्वल स्थानी आहे. त्यानंतर इंग्लंडने ३४ षटकार फटकावले आहेत. या दोन संघांनीच ३०पेक्षा अधिक षटकार ठोकले आहेत. भारताच्या नावावर
१८ षटकार आहेत.

78
चौकारांनी ६२.९३ टक्के धावा इंग्लंडने फटकावल्या
असून, वेस्ट इंडिजने ६१ चौकारांच्या साह्याने ६५.३४ टक्के धावा केल्या आहेत.

9.50 अशा सरासरीने इंग्लंडने पॉवर प्लेदरम्यान धावा वसूल केल्या आहेत. त्यात इंग्लंडने ३८ चौकार व
७ षटकार फटकावले आहेत. सरासरी प्रत्येक चार चेंडूंमागे एक चौकार मारलेला आहे. वेस्ट इंडिजने ६.४६च्या सरासरीने धावा केल्या असून, प्रत्येक ५.४ चेंडूंनंतर एक चौकार फटकावला आहे.

Web Title: T-20 champions today will decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.