टी-२० विश्वकप : भारत द. आफ्रिका, विंडीजसोबत सराव सामने खेळणार
By admin | Published: February 17, 2016 02:43 AM2016-02-17T02:43:14+5:302016-02-17T02:43:14+5:30
मार्च महिन्यात प्रारंभ होत असलेल्या विश्वकप टी-२० स्पर्धेपूर्वी यजमान भारतीय संघ वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सराव सामने खेळणार आहे.
नवी दिल्ली : मार्च महिन्यात प्रारंभ होत असलेल्या विश्वकप टी-२० स्पर्धेपूर्वी यजमान भारतीय संघ वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सराव सामने खेळणार आहे.
भारताच्या यजमानपदाखाली आयोजित विश्वकप स्पर्धेत टीम इंडिया १० मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर वेस्ट इंडीजविरुद्ध, तर १२ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामने खेळणार आहे.
विश्वकप स्पर्धेत सहभागी होत असलेल्या संघांचे पहिल्या फेरीतील सराव सामने ३ ते ६ मार्च या कालावधीत धर्मशाला व मोहाली येथे खेळल्या जाणार आहे. तर, दुसऱ्या फेरीतील लढती १० ते १५ मार्च या कालावधीत कोलकाता व मुंबई येथे सराव सामने होतील.
महिला टी-२० विश्वकप स्पर्धेचे सराव सामने १० ते १४ मार्च या कालावधीत बंगळुरू व चेन्नई येथे आयोजित करण्यात येणार आहेत. भारतीय महिला संघ बंगळुरूमध्ये १० मार्च रोजी आयर्लंडविरुद्ध एकमेव सराव सामना खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुरुषांचे सराव सामने दुपारी ३ वाजता आणि सायंकाळी ७.३० वाजता प्रारंभ होणार आहेत. उपांत्य व अंतिम फेरीचे सामने सायंकाळी ७ वाजता प्रारंभ होतील. महिलांचे सामने दुपारी ३.३० वाजता प्रारंभ होतील, तर सायंकाळचे सामने ७.३० वाजता प्रारंभ होतील.
> विश्वकप सराव सामन्यांचा कार्यक्रम
३ मार्च - झिम्बाब्वे विरुद्ध स्थानिक संघ (धर्मशाला), आयर्लंड विरुद्ध हाँगकाँग (धर्मशाला).
४ मार्च - हॉलंड विरुद्ध स्थानिक संघ (मोहाली), ओमान विरुद्ध स्कॉटलंड (मोहाली).
५ मार्च - आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे (धर्मशाला), बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग (धर्मशाला).
६ मार्च - स्कॉटलंड विरुद्ध हॉलंड (मोहाली), अफगाणिस्तान विरुद्ध ओमान (मोहाली).
१० मार्च - भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (कोलकाता), न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (मुंबई).
१२ मार्च - स्थानिक संघ विरुद्ध पाकिस्तान (कोलकाता), न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड (मुंबई), भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (मुंबई).
१३ मार्च - आॅस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज (कोलकाता).
१४ मार्च - इंग्लंड विरुद्ध स्थानिक संघ (मुंबई), पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (कोलकाता).
१५ मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्थानिक संघ (मुंबई).
अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि ओमान या संघांनी आशिया कप स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली, तर सराव सामन्यांच्या कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता आहे.