टी-२0 वर्ल्डकप रद्द?

By admin | Published: June 19, 2017 01:05 AM2017-06-19T01:05:19+5:302017-06-19T01:05:19+5:30

२0१८ मध्ये अधिकांश देश द्विपक्षी मालिकेत व्यस्त असल्यामुळे सातवी वर्ल्डकप टी-२0 स्पर्धा जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे आणि या स्पर्धेचे आयोजन २0२0 मध्ये होऊ शकते.

T20 World Cup canceled? | टी-२0 वर्ल्डकप रद्द?

टी-२0 वर्ल्डकप रद्द?

Next

लंडन : २0१८ मध्ये अधिकांश देश द्विपक्षी मालिकेत व्यस्त असल्यामुळे सातवी वर्ल्डकप टी-२0 स्पर्धा जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे आणि या स्पर्धेचे आयोजन २0२0 मध्ये होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) सूत्रांनुसार आयसीसी वर्ल्डकप टी-२0 स्पर्धेचे पुढील आयोजन २0२0 मध्ये होईल; परंतु त्यासाठी स्थळ अद्याप निश्चित झालेले नाही. सूत्राने म्हटले, ‘२0१८ मध्ये वर्ल्डकप टी-२0 स्पर्धा आयोजित होणार नाही. कोणत्याही स्थळाचा निर्णय घेण्यात आला नाही. मुख्य कारण म्हणजे सदस्य देशांदरम्यान जास्त द्विपक्षीय मालिका होणार आहेत. २0१८ मध्ये स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता नाही; परंतु २0२0 मध्ये ही स्पर्धा होईल. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका अथवा आॅस्ट्रेलियात होऊ शकते. द्विपक्षीय मालिकेशिवाय अन्यदेखील कारण आहे. आयसीसी स्पर्धा खूप होत असल्यामुळे सदस्य देशांच्या मते त्यांनादेखील पुरेशा वेळेची आवश्यकता आहे.’
वर्ल्डकप टी-२0 चे आयोजन न होणे आयसीसीसाठी मोठा धक्का आहे का, असे विचारले असता, तो म्हणाला, ‘निश्चितच नाही. पर्याप्त टी-२0 लीग आहेत आणि चाहत्यांसाठी खूप क्रिकेट आहे.’ भारतीय संघ पुढील वर्षी अधिकांश वेळेत दौऱ्यावर असेल आणि ज्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेपासून होईल. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया दौऱ्यावरही जाणार आहे. सध्या २0१२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची पुढील स्पर्धा भारतात आयोजित करण्याचे वेळापत्रक आहे.
उद्यापासून येथे सुरू होणाऱ्या आयसीसी वार्षिक संमेलनात विश्व टेस्ट चॅम्पियनशिपवर चर्चा होऊ शकते. आयसीसी प्रदीर्घ वेळेपासून सर्वच स्वरूपातील कमीत एक जागतिक स्पर्धा सुरू करण्याची योजना बनवत आहे. प्राप्त माहितीनुसार बीसीसीआय आता प्रस्तावित आपले ३९ कोटी डॉलरच्या हिश्श्यातील फायद्याचा आग्रह करू शकतो; परंतु सदस्य देश त्याला अयोग्य मानतात. त्यामुळे ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता नाही. 

आतापर्यंत दक्षिण आफ्रिका (२00७), इंग्लंड (२00९), वेस्ट इंडीज (२0१0), श्रीलंका (२0१२), बांगलादेश (२0१४) आणि भारत (२0१६) यांनी वर्ल्डकप टी-२0 चे आयोजन केले आहे. द्विपक्षीय मालिकेने सर्वच देशांची कमाई होते त्याचा मोठा भाग हा प्रसारण करारापासून येतो. विशेषत: भारताने एखाद्या देशाचा दौरा केल्यास यजमान बोर्डाला टीव्ही प्रक्षेपण हक्कातून लाखो डॉलरची कमाई होत असते.

Web Title: T20 World Cup canceled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.