टी २० विश्वचषक फायनलः वेस्ट इंडिजने इंग्लंडला १५५ धावांवर रोखले
By admin | Published: April 3, 2016 08:33 PM2016-04-03T20:33:02+5:302016-04-03T20:38:52+5:30
गोलंदाजांच्या शिस्तबद्ध गोंलदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लडंला चांगलेच झुलवले, वेस्ट विंडिजच्या तगड्या गोंलदाजी पुढे निर्धारिती २० षटकात इंग्लंडला ९ बाद १५५ धावापंर्यंत मजल मारता आली.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ३ - गोलंदाजांच्या शिस्तबद्ध गोंलदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लडंला चांगलेच झुलवले, वेस्ट विंडिजच्या तगड्या गोंलदाजी पुढे निर्धारिती २० षटकात इंग्लंडला ९ बाद १५५ धावापंर्यंत मजल मारता आली. वेस्ट इंडिजतर्फे डेव्हेन ब्राव्हो आणि कार्लोस ब्रेथवेट यांनी इंग्लंडच्या ३ फलंदाजांना बाद केले तर सॅम्युअल बद्रीने २ फंलदाजांची शिकार केली. टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळला जात आहे. या महत्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरन सॅमीने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सॅमीने सलग दहाव्यांदा नाणेफेकीचा कौल जिंकला आहे.
जो रूट (५४) आणि जोस बटलर (३६) यांच्या धमाकेदार खेळीच्या बळावर इंग्लंडने निर्धारित २० षटकात १५५ धावा केल्या. त्यामुळे टी २० विश्वचषक जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला १५६ धावांची गरज आहे. इंग्लंडची सुरवात आतिशय निराशजनक झाली, त्यांना सुरवातीच्या पहिल्या पाच षटकातच तीन धक्के बसले. पाच षटकात इंग्लंडने तीन बाद २३ धावा केल्या होत्या. पहिल्या षटकाच्या दुस-याच चेंडूवर शून्यावर इंग्लंडला पहिला धक्का बसला.
सलामीवीर रॉयच्या बद्रीने शून्यावर यष्टया वाकवल्या. उपांत्यफेरीत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात रॉय इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. त्यानंतर हेल्सला एका धावेवर रसेलने बद्रीकरवी झेलबाद केले. कर्णधार मॉर्गनला ५ धावांवर बद्रीने गेलकरवी झेलबाद केले. रुट आणि बटलर यांनी चौथ्या गड्यासाठी ६.४ षटकात ६१ धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या वेगाने वाढवली.
दोन्ही संघांनी अंतिम सामन्यासाठी उपांत्यफेरीतील विजेता संघ कायम ठेवला आहे. इंग्लंडने पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला सात गड्यांनी धूळ चारली. वेस्ट इंडिजने दुसऱ्या उपांत्य सामन्यात जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला सात गड्यांनी पराभूत केले.
१९७९ मध्ये क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघाने इंग्लंडला पराजित करून विश्वविजेतेपद पटकाविले होते. या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास डॅरेन सॅमी आणि कॅरेबियन संघ प्रयत्नशील असेल. या स्पर्धेत एकाही संघाला दोन वेळा विजतेपद मिळविता आलेले नाही. परंतु आज इतिहास घडणार आहे. दोन्ही पैकी कोणताही संघ जिंकल्यास त्यांचे हे दुसरे विश्वविजेतेपद असणार आहे. इंग्लंडने २०१० मध्ये तर २०१२ मध्ये वेस्ट इंडीजने टी२० विश्वकरंडक पटकाविला होता.