गुणवान युवा खेळाडूंना मिळाले उत्कृष्ट व्यासपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 02:02 AM2020-02-27T02:02:03+5:302020-02-27T02:02:37+5:30
खेलो इंडिया शालेय तसेच महाविद्यालयीन स्पर्धांनी अशीच अपेक्षा जागवली आहे.
- धनराज पिल्ले
खेलो इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा युवा खेळाडूंसाठी आॅलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद,आशियाई स्पर्धा आणि राष्टÑकुल स्पर्धेसारख्या मोठ्या व्यासपीठावर कौशल्य दाखविण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी आहे. यासाठी क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकारणाचे अभिनंदन करतो. अमेरिकेत महाविद्यालयीन स्पर्धा मोठी स्पर्धात्मक असते. एनसीएएद्वारा निर्धारित महाविद्यालयांमध्ये युवा खेळाडूंच्या सरावासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध केली जाते. टेनिसपटू सोमदेव देवबर्मन हा याच स्पर्धेतील शोध आहे, खेलो इंडिया शालेय तसेच महाविद्यालयीन स्पर्धांनी अशीच अपेक्षा जागवली आहे.
वैयक्तिक सांगायचे तर गुजरातच्या शाळांमध्ये अनन्य साधारण हॉकी गुणवत्ता उपलब्ध आहेत. अशा युवा खेळाडूंना अधिक संधीची गरज आहे. या दिशेने खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा चांगली सुरुवात आहे. या स्पर्धेत १७ क्रीडा प्रकारात ४००० खेळाडू सहभागी झाले आहेत.
धावपटू द्युतीचंद हिने वेगळी छाप सोडली. मी अनेक शहरांमधील शाळांमध्ये खेळाची लोकप्रियता अनुभवली आहे. मात्र शालेय स्तावर चमक दाखविणारे खेळाडू महाविद्यालयापर्यंतच्या वाटचालीत टिकत नाहीत. त्यांच्यापुढे मर्यादित संधी असल्याने असे होत असावे. जे क्लबसाठी खेळतात तेच यात ताळमेळ साधू शकतात. अन्य खेळाडू मात्र खेळापासून दुरावतात. या खेळांच्या माध्यमातून यशस्वी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर उत्कृष्ट कोचिंग, सुविधा आणि प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे.
या आगळ्यावेग़ळ्या आयोजनाद्वारे २०२४ आणि २०२८ च्या आॅलिम्पिक पदक तालिकेत मागच्या सर्व आयोजनांच्या तुलनेत भारत अधिक चांगली कामगिरी करेल, यात शंका नाही.
खेळातील आतापर्यंतच्या अनुभवाच्या आधारे मी इतकेच सांगू शकतो की भारतीय खेळाडू देशासाठी पदक आणि गौरव जिंकतील तो दिवस आता दूर नाही.
(पद्मश्री धनराज पिल्ले चार वेळेचे आॅलिम्पियन खेळाडू असून १९९८ च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण विजेते हॉकीपटू आहेत.)